β : नाशिक :⇔ पिकविमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै,शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आव्हान-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔ पिकविमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै,शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आव्हान-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
पिकविमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै, शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आव्हान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 12 जून 2024
β⇔नाशिक, दि.12 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नाशिक तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की , प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2014 असून सर्व शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
या योजनेमध्ये खरीप हंगामा मधील सोयाबीन ,भात ,मूग ,उडीद ,भुईमू, मका या पिकाची विमा नोंदणी करण्यात येणार आहे केवळ एक रुपया भरून योजनेत नोंदणी करता येणार आहे .या खरीप हंगामातील प्रति कुल परिस्थिती ,उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या बाबीपासून विकास विमा संरक्षण मिळणार आहे . विमा सेतू केंद्रावर भरायचा असून एक रुपया अतिरिक्त अधिकची रक्कम देऊ नये .
या योजनेमध्ये पीक निहाय सोयाबीन प्रती हेक्टर 49 हजार 500 रूपये ,भात प्रती हेक्टर 49 हजार 500 रुपये , भुईमुग प्रति हेक्टर 42 हजार 970 रूपये ,सोयाबीन प्रती हेक्टर 35 हजार 598 रुपये, एवढी रक्कम संरक्षित केली आहे . तरी शेवटच्या दिवसांमध्ये योजनेच्या पोर्टल व तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलै 2024 च्या आत पीक विमा भरावा . यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा, आठ अ ,उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कृषी भटू पाटील यांनी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)