





जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने “वार्षिक स्नेहसंमेलन रंगमंच आनंदाचा” उत्साहात संपन्न

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.24 मार्च 2024
β⇔ पेडगाव जुने दि. 24 ( प्रतिनिधी : दिगंबर भुजबळ) :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2023- 2024 ‘ रंगमंच आनंदाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात अनेक पारंपरिक लोकगीते, लावण्या,गोंधळ गीते, गवळणी, देशभक्तीपर गीते, समाज प्रभोधनपर नाटीका सादर करण्यात आल्या. कार्यक्रम इतका बहारदार होता, की शेवटच्या गीता पर्यंत कोणीही आपली जागा सोडली नाही.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ईरफान पिरजादे सहकुटूंब शेवटच्या कार्यक्रमापर्यंत उपस्थित होते. माजी सरपंच भगवान आप्पा कणसे,हसनभाई शेख ,विनोद म्हस्के, पत्रकार बाळासाहेब काकडे, शिवदुर्ग ट्रेकर्सचे सचिव सोमेश शिंदे,अकबर आतार, कंगणे,दिपक म्हस्के, भीमराव म्हस्के, महेंद्र म्हस्के, बशीर हवालदार, रफीक शेख,लतीफ शेख,शामराव जाखडे,माजी उपसरपंच प्रकाश घोडके ,सचिन आढागळे,उत्तम आव्हाड,भरत खामकर उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन रंगमंच आनंदाचा ह्या कार्यक्रमास पत्रकार शफीक हवालदार आणि आप्पा मोहिते यांनी विशेष मोलाचे सहकार्य करून शाळेस 66,501/-रूपये देणगी मिळवून दिली. आमच्यावर प्रेम करणारे तालुक्यातील व पेडगाव केंद्रातील सर्वच उपस्थित शिक्षक बांधव व भगिनींनी आम्हाला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. कौतुकाची थाप आमच्या चिमुकल्यांच्या पाठीवर टाकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजयकुमार लंके यांनी केले. सदर कार्यक्रमात कलाकार म्हणून श्रीमती वैशाली परहर व श्रीमती रंजना क्षीरसागर यांनी चोख भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार लंके,श्रीम.वैशाली परहर ,श्रीमती रंजना क्षीरसागर , दिलीपकुमार रासकर, दिगंबर भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. राणू घोडके , शा.व्य.समिती अध्यक्षा सौ.आश्विनी सरताप ,उपाध्यक्षा सौ.वैशाली खराडे व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी आजी-माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचात सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन संचालक , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य शाळेच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी यांनी शाळेला मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन संतोष खोमणे व दिगंबर भुजबळ यांनी केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने दिलीपकुमार रासकर यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०