





सिद्धी इंटरनॅशनल अकॅडेमी”अर्पण प्रोजेक्ट”अंतर्गत भग्न मुर्त्या व फोटो, फ्रेमचे विधिवत पूजन करून विसर्जित

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 18 डिसेंबर 2023
β⇔ताहाराबाद ,ता 18 (प्रतिनिधी : डॉ. प्रसाद सोनवणे ) :- येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण ,रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाण व प्राईड आणि इन्ट्रॅक्ट क्लब सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने “अर्पण” प्रोजेक्ट अंतर्गत सर्व मंदिरातील भग्न मुर्त्या व मंदिरात सोडलेल्या फोटो, फ्रेमचे गोळा करून सिद्धी इंटरनॅशनल अकॅडेमी करंजाड येथे रोटरीचे अध्यक्ष डॉ. प्रसाद सोनवणे, शुक्ल गुरु यांच्या हस्ते शास्त्र शुद्ध मंत्राने विधिवत पूजा करून विसर्जित करण्यात आल्या.
सर्व रोटेरिअन्स, रोट्रॅक्टर्स व इन्ट्रॅक्टर्स ह्यांनी सटाणा शहर व ताहाराबाद परिसरात गावोगावी मंदिरांची साफसफाई करून तेथे नागरिकांनी टाकलेल्या भग्न मूर्ती, देवांच्या मुर्त्या,फोटो फ्रेम्स इ. गोळा करुन सिद्धी इंटरनॅशनल अकॅडेमी येथे आणल्यात व येथे रोटरीचे अध्यक्ष डॉ. प्रसाद सोनवणे , शुक्ल गुरु यांच्या हस्ते शास्त्र शुद्ध मंत्राने पुजा करुन विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी रोटरी चे अध्यक्ष डॉ प्रसाद दादा सोनवणे, रोटरॅक्ट विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे,रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा प्राईड अध्यक्ष हर्षदा पाटील,सचिव मनिष शेलार,पूर्वा धोंडगे,प्रियंका खैरनार,पियुष अंधारे,आशु देवरे,अवंतीका मेढे व सिद्धी अकॅडमीचे सर्व शिक्षक कर्मचारी,विद्यर्थी उपस्थित होते. या उपक्रमाने देवांना देवपण दिल्याचे व आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होतं आहे..
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०