Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगराजकिय

β⇔त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा – ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे )

β⇔त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" साजरा - ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे )

0 1 2 9 1 1

 त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा 

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : बुधवार: दि. 18  ऑक्टोबर  2023
β⇔ त्र्यंबकेश्वर, ता. 18  ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे ):- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे आज ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम’ यांच्या जयंतीनिमित्त‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा कारण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये ग्रंथप्रदर्शन, काव्यवाचन, ग्रंथ परीक्षण पुस्तिका प्रकाशन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल. कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
       ” वाचाल तर वाचाल” या पंक्तीप्रमाणे त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाने हा स्तुत्य उपक्रम राबवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग ५ तास अभ्यास करण्याचा निर्णय घेतला व सगळ्याच विद्यार्थ्यांनी यास उत्फुर्त प्रतिसाद दिला.वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले.
      या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी भाषणात आपल्या ओघवत्या शैलीमध्ये ग्रंथ व वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.त्यांनी वाचनाचे महत्व पटवून देताना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वामी विवेकानंद या महापुरुषांची उदाहरणे दिली .डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अंतराळ संशोधनात खूप मोठी झेप घेतली,  हे सगळे वाचनामुळे घडले.ग्रंथ जरी निर्जीव असले, तरी ते माणसाला सजीव करण्याचे कार्य करतात.ग्रंथ माणसाला बोलायला शिकवितात,प्रश्न विचारायला शिकवितात.आपल्या जीवनाचा शाश्वत विकास करायचा असेल तर वाचन केले पाहिजे,वाचन केल्याने स्मरणशक्ती वाढते, वाचनाने मानसिक आरोग्य सुधारते,व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम ग्रंथ करतात.माणसाची वैचारिक भूक भागवून त्यांना पुढे जाण्यासाठी ग्रंथ सतत मदत करत असतात. फक्त तुम्ही त्यांना वाचत राहा. वाचनाचे फायदे सांगुन वाचन संस्कृतीचे महत्व विशद केले. 
       काव्यवाचन स्पर्धेमध्ये स्वरचित कविता मध्ये कु. आरती आहेर,  कु.जान्हवी मिंदे ,कु श्रृती.मिंदे   तर संकलित कवितामध्ये कु.दर्शना लोढें,कु. गौरी जाधव ,कु.धम्मदिपा गांगुर्डे  या विद्यार्थ्यानी अनुक्रमे प्रथम ,द्वीतीय व् तृतीय क्रमांक प्राप्त केला . सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालययाचे उपप्राचार्य डॉ.शरद कांबळे, सत्रप्रमुख डॉ.राजेश झनकर, प्रा.ललिता सोनवणे,डॉ.जया शिंदे,प्रा.अर्चनाधारराव,डॉ.नयना पाटील,प्रा.नीता पुणतांबेकर,डॉ. सुलक्षणा कोळी,प्रा.मंजुषा नेरकर,प्रा.शितल पिंगळे,प्रा.वर्षा मोगल,प्रा.अनिता मोगल, प्रा.स्वाती संगमनेरे,प्रा.निखिल सोनवणे यांची उपस्थिती होती.कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. विधार्थी विकास अधिकारी प्रा.मनोहर जोपळे, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वर्षा जुन्नरे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.संदीप निकम व आभार प्रा.एस.जे.गांगुर्डे यांनी मानले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ.भागवत महाले : मो.८२०८१८०५१० 
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!