





कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रम शाळेत ‘आदि-उमंग अभियानातून विविध उपक्रमांनी “वाचन प्रेरणा दिन” साजरा !
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा अंतर्गत ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ ‘‘वाचू आनंदी “उपक्रम साजरे – विशाल नरवाडे – सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,कळवण

β⇒“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 17 ऑक्टोबर 2023
β⇒बोरगाव , ता .16 ( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल ) :- माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून प्रकल्पांतर्गत 40 शासकीय, 39 अनुदानित आश्रम शाळा, 29 वसतीगृह व 3 एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन करण्यात येवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ ‘‘वाचू आनंदी “उपक्रम साजरे करण्यात आले .
डॉ.कलाम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून उदयास येणार आहे, हे सांगतांना भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती आहे , ते नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन स्कूलमध्ये करण्यात येत आहे.डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने दिवसातील एक तास वाचनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी बोलताना केले.
ते पुढे बोलतांना म्हणाले की , समाज सहभागातून वाचन कट्टा अंतर्गत पुस्तके गोळा करुन शाळेत, पुस्तकपेढी तयार करणे, शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करून विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे आवश्यक आहे. साहित्यिक, लेखक,कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, चर्चासत्रे घडवून आणणे, सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ दिन म्हणून साजरा करण्यात यावा,याशिवाय वाचन प्रेरणा दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा.शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, आवश्यक आहे, असून गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, ग्रामसेवक,तलाठी,कृषी अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ,गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थ्यांनी, पालक यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून यांच्याकडून शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील ,अशी एक -एक पुस्तक भेट देण्यास सहकार्य करण्यास सांगावे . तसेच एक व्यक्ती एक पुस्तक भेट” विशेषत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाची आठवण म्हणून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीने शाळेत एक पुस्तक भेट देणे . हा उपक्रम राबविणे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. असे विशाल नरवाडेसहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,कळवण यांनी आदि-उमंग अभियानाच्या माध्यमातून राबविण्यास सांगितले .
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
