β⇒ पुणे : नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला ! – ( प्रतिनिधी : डॉ . भागवत महाले )
नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला
नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : पुणे प्रतिनिधी : डॉ .भागवत महाले
β⇒ पुणे , ता.८ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ): सावदा ( जळगाव) च्या नेहा नारखेडे यांचा जगातील सर्वात मोठया श्रीमंत महिला म्हणुन फोर्ब्स मासिकाने सन्मान केला. मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या यशात भारतीयांचाही मोठा वाटा आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी ४२ हजार कोटींची संपत्ती, पुण्याच्या नेहा नारखेडे जगातील सर्वात श्रीमंत महिला, फोर्ब्सने केला सन्मान. नेहा नारखेडे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचा नुकताच जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांची स्थापना तसेच त्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांच्या यादीत सामावेश झाला आहे. नेहा या स्वबळावर यशस्वी बनलेल्या भारतातील सर्वात तरुण यशस्वी महिला उद्योजिका आहेत.
पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या नेहा नारखेडे यांनी यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नेहा यांनी सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंट आणि फ्रॉड डिटेक्शन कंपनी ऑसिलेटरच्या सह-संस्थापक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. नेहा याना २०२१ मध्ये ८ व्या सर्वात श्रीमंत भारतीय महिला म्हणून किताब मिळाला. त्याच्या कंपनीच्या ब्लॉकबस्टर IPO च्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ४२००० कोटी रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:ला भारतातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला उद्योजिका म्हणून कायम ठेवले आहे.
नेहा नारखेडे यांची शैक्षणिक वाटचाल पुण्यात झाली. त्या लहानाच्या मोठ्याही पुण्यातच झाल्या. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवी प्राप्त केली. यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जॉर्जिया टेक अमेरिका येथून पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीमधून केली. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती 360 दशलक्ष डॉलर होती, जी 2020 मध्ये वाढून 600 दशलक्ष डॉलर झाली. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची संपत्ती झपाट्याने वाढून ९२५ दशलक्ष डॉलरवर पोहोचली. त्यांच्या ” कॉनफ्यूंयंट” कंपनीची अमेरिकेत जोरदार चर्चा चालू आहे. तंत्रज्ञान जगातील सर्वात प्रभावशील महिला म्हणून नेहा यांचं कौतुक आहे . तरुणांनी प्रेरणा घ्यावं अशा उद्योजिका नेहा नारखेडे यांचं अभिनंदन.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०