0
1
5
5
3
8
येडशी येथे सोमवार पासुन श्रीरामलिंग यात्रेस प्रारंभ

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 31 जून 2024
β⇔येडशी (धाराशिव) दि.31 ( प्रतिनिधी : सुभान शेख):- ‘सोलापुर ते छत्रपती संभाजीनगर’ मध्यभागी असलेले धाराशिव तालुक्यातील येडशीपासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेले श्री.रामलिंग देवस्थान मागील अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. या रामलिंग देवस्थान येथे मागील अनेक वर्षापासून दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात यात्रा भरवली जाते.
ही यात्रा संपुर्ण श्रावण महिन्यात एक महिनाभर यात्रा भरते. या यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक श्री.रामलिंग देवस्थान येथे मंदिरात दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. या यात्रेत रामलिंग देवस्थान जवळ फार प्राचीन काळापासून सिताची न्हाणी , पाण्याचा धबधबा , श्री. श्रीराम प्रभुचे वानरसेना असलेले माकडे आहेत. या रामलिंग यात्रेत खेड्या – पाड्यातील स्वतः ची उपजिविका भागविण्यासाठी व्यावसायिक दुकानदार आप आपले दुकाने मांडुन बसतात. या यात्रेत पाळने , खेळण्याची दुकाने , कंदमुळे , अशा अनेक वेगवेगळे प्रकारचे दुकाने मांडुन बसतात. या श्रावण महिन्यात दरवर्षी या रामलिंग यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थीनीची शैक्षणिक सहल ये – जा होते. या श्री.रामलिंग देवस्थान च्या भोवताली गवताचे हिरवागार असलेले गवत , झाडे बघण्यासाठी परिसर आहे.
श्री. तिर्थक्षेत्र रामलिंग देवस्थान ला मिनी महाबळेश्वर च्या स्वरूपात ओळखले जाते. तरी , या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील संपूर्ण भाविक भक्तांनी या श्री. तिर्थक्षेत्र रामलिंग देवस्थान ची यात्रा भरत असलेली यात्रेचा लाभ घेण्यात यावा. अशी हाक रामलिंग देवस्थान मधील व्यावसायिक दुकानदारांनी हाक दिली आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510