β : नाशिक:⇔प्रियकराच्या हत्येसाठी महिला शिक्षिकेने दिली आपल्याच विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔प्रियकराच्या हत्येसाठी महिला शिक्षिकेने दिली आपल्याच विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
प्रियकराच्या हत्येसाठी महिला शिक्षिकेने दिली आपल्याच विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 22 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.22 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक येथील पंचवटी भागात एका सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आली होती, त्या हत्येच कारण समोर आलं असून,अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या वागणुकीचे धडे देणारी शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आला आहे.
नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तपासा दरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली असून हत्या झालेल्या तरुणाचं नाव गगन कोकाटे असं आहे. गगन हा राहणार मसरूळ परिसरातील होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षिकेने त्याची हत्या केल्याचं उघडकीस आला आहे. गगन कोकाटे आणि आरोपी शिक्षिका भावना कदम हे दोघे शेजारीच राहत होते त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र या प्रेम प्रकरणात गगन हा भावना यांना भेटण्यासाठी सारखा त्रास देत असायचा, त्याचा राग मनात धरून भावना कदम गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयाची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
भावना कदम ही विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातूनच तिची संकेत, मेहबूब, प्रितेश, आणि अन्य लोकांशी ओळख झाली. चारही मुले सामान्य कुटुंबातील असून सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगार आहेत. केवळ पैशाच्या लोभापाई त्यांनी गुन्हा मध्ये सहभाग घेतल्याचा त्यांनी कबूल केले आहे. भावनाने गगन याला नेहमीच्या जागेवर भेटण्यासाठी बोलावून त्या ठिकाणी संशयीत अगोदरच लपून बसले होते. गगन तिथे आल्यावर भेटण्यासाठी आल्यानंतर लपून बसलेल्या गुन्हेगारांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी संकेत रणदिवे (वय 20 ),मेहबूब सय्यद (वय 18), रितेश सपकाळे (वय 20), हे तिघेही अशोक नगर आणि तसेच गौतम दुसाने( वय 18) राहणार गंगापूर रोड, यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन यांच्या हत्येसाठी भावना कदम राहणार मसरूळ हिने आम्हाला दोन लाख रुपये देण्याची कबूल केले होते.पोलिसांनी भावना कदम हिला ही ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पंचवटी पोलीस करत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )