β : नाशिक :⇔बम.. बम.. भोले च्या गजरात फेरीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔बम.. बम.. भोले च्या गजरात फेरीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
बम.. बम.. भोले च्या गजरात फेरीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 18 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.18 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासूनच भाविक बम – बम भोले च्या गजरामध्ये प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरला दाखल होण्यास सुरुवात झाली. मंदिरा लगत वाहनांना प्रवेश बंदी असल्यामुळे खांबाळ्यापासून भाविकांना एसटी बस व सिटी लिंक च्या बसने प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळातर्फे 270 आणि सिटी लिंक कडून 80 बस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.,अनेक भावीक रविवारी दुपारपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत.
रविवार सायंकाळी प्रदक्षिणेला सुरुवात होत असून दरम्यान संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्यातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी खंबाळापासूनच खाजगी वाहनांना प्रवेशाला प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे फेरीसाठी आलेल्या भाविकांना तसेच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एसटी किंवा सिटीलींकच्या बसने त्र्यंबकेश्वर पर्यंत प्रवास करावा लागेल. खाजगी वाहने उभी करण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर साठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एकूण 270 जादा बस गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
यापैकी 190 गाड्या नाशिक वरुन तर खंबाळा येथून 50 गाड्या फेरीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सिटीलींकडून नियमित व अतिरिक्त अशा एकूण 80 जादा बस गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. रविवारी (दि.१८) आणि सोमवारी (दि.१९) असे दोन दिवस या गाड्या उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय ही टळणार आहे. एसटी बस गाड्या ह्या नवीन सीबीएस बसस्थानक, आंबोली, पहिणे, घोटी, खंबाळे या ठिकाणाहून सोडवण्यात येणार आहेत. तर पंचवटीतील निमानी बस स्थानकावरून त्र्यंबकेश्वर साठी बस गाड्या उपलब्ध राहतील, तसेच नाशिक रोड वरून त्रंबकेश्वर ला जाण्यासाठी देखील बस गाड्या सोडल्या जातील.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )