“विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल सारखे हत्यार न देता त्यांना अभ्यासात प्रवृत्त करावे “ – स्कूल कमिटी अध्यक्ष : विजय कारे
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
β⇒ सायखेडा ( निफाड), ता. ८ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- पालकांनी पाल्याच्या गुणवत्तेविषयी सतत जागृत राहून मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष श्री. विजय कारे यांनी केले . ते जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य विभागाचा पालक शिक्षक मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलत होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख संजय जगताप यांनी केले.
या कार्यक्रमास अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले , विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम, पालक संघाचे उपाध्यक्ष श्याम सोनवणे, हरिभाऊ दळवी, विभाग प्रमुख प्रा.संजय जगताप, श्री कांडेकर, पर्यवेक्षक दौलत शिंदे, अवधूत आवारे , अशोक डेरले उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे एम एल , श्रीमती शिंदे व्ही व्ही यांनी केले .
यावेळी पालक मेळाव्यात आलेल्या पालकांना प्रा.श्री संधान यांनी मार्गदर्शन केले .विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम म्हणाले, की पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त, गणवेश, उपस्थिती बाबत, मोटरसायकल न आणण्याबद्दल मार्गदर्शन केले .पालकांनाही आपली जबाबदारी ओळखून पाल्याच्या भविष्यासाठी प्रयत्न करावे कार्यक्रमाचे आभार श्री हेमंत काळे यांनी मांडले .या पालक मेळाव्यास पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . 8208180510