Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

  β : नाशिकरोड :⇒: बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ भारतीय अर्थव्यवस्था ‘ या विषयावर व्याख्यान  समारंभ संपन्न .( प्रतिनिधी : संजय परमसागर )

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ' भारतीय अर्थव्यवस्था ' या विषयावर व्याख्यान  समारंभ संपन्न .( प्रतिनिधी : संजय परमसागर )

0 0 2 5 6 2

बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ भारतीय अर्थव्यवस्था ‘ या विषयावर व्याख्यान  समारंभ संपन्न .

 • β : नाशिकरोड :⇒: बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ' भारतीय अर्थव्यवस्था ' या विषयावर व्याख्यान  समारंभ संपन्न .( प्रतिनिधी : संजय परमसागर )
  β : नाशिकरोड :⇒: बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ भारतीय अर्थव्यवस्था ‘ या विषयावर व्याख्यान  समारंभ संपन्न .( प्रतिनिधी : संजय परमसागर )
 •   β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज   : नाशिक : शुक्रवार :दि.  ५ ऑक्टोबर २०२३   
 • नाशिकरोड  ता. ६ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक लागतो . भारतीय अर्थव्यवस्थेत शेती , हस्तव्यवसाय , कापडगिरण्या ,, उद्योगधंदे उत्पादन आणि विविध प्रकारच्या सेवा महत्वपूर्ण घटक आहेत . लोकसंख्या व वाढती सामाजिक विषमता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत .आज जगापुढे आशादायक चित्र निर्माण केले आहे . आव्हानना पेलवण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे . त्यासाठी योग्य नियोजनाची प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे व ती होते आहे ,” असे मार्गदर्शन करताना डॉ. विनायक गोविलकर यांनी केले .
   ‌                    गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात गुरुवार दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सर डॉ. मो. स. गोसावी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जेष्ठ अर्थतज्ज्ञ व सनदी लेखापाल सर डॉ. विनायक गोविलकर यांचे ‘ भारतीय अर्थव्यवस्था : स्थिती , सामर्थ्य आणि आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते . याप्रसंगी व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या . तसेच नाशिकरोड शाखा सचिव व सहखजिनदार डॉ. आर. पी. देशपांडे , विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी , नाशिकरोड शाखा उपशाखा सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी , आस्थापना संचालक शैलैश गोसावी व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले .
 •               कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ उन्मेष ‘ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले . ‘ सर डॉ. मो. स. गोसावी विचारधन ‘ प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली . राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी वतीने बिटको हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सर डॉ. मो. स. गोसावी यांचे ‘ माझ्या मनातील पान ‘ या निबोधीचे अभिवाचन चित्रफितीसह डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले . एच. एस. सी व्होकेशनल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. अशोक मोजाड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .
 • ‌. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे यांनी सांगितले की , संस्थेचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी सर यांनी आपल्या वाणी , लेखनातून व विचारातून अनेक विद्यार्थी व शिक्षकांना नवीन मार्ग, शिकवण व दृष्टी दिली . अफाट बुद्धिमत्ता व गुणवत्तेचा परामर्ष सरांनी दिला , त्यांचे जीवन अलौकिक होते. अनेकांचे जीवन त्यामुळे उजळले . त्यांनी दिलेल्या मार्गाने आपण एकजुटीने संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी अग्रेसर रहा , असे सांगून नाशिकरोड महाविद्यालय हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे, त्यासाठी शुभेच्छा दिल्या ..
 •  ‌               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले, तर आभार जयंत भाभे यांनी मानले . तंत्रसहाय्य निलेश महाजन व डॉ. मनेष पवार यांनी सांभाळले . कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ.आकाश ठाकूर , विज्ञान विभाग समन्वयक डॉ. कल्याणराव टकले , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे , सर डॉ.मो.स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रद्धा देशपांडे , डॉ. के. एम. लोखंडे , कुलसचिव राजेश लोखंडे यासह विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
 •   β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज   : नाशिक : शुक्रवार :दि.  ५ ऑक्टोबर २०२३   
  β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज   : नाशिक : शुक्रवार :दि.  ५ ऑक्टोबर २०२३

दिव्य भारत बीएसएम न्यूज  : मुख्य संपादक : मो.८२०८१८०५१० 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 2

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!