β : नाशिक रोड :⇔छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट,नाशिक, महाराष्ट्र राज्यचा वर्धापन दिन उत्साहात साजरा !-(प्रतिनिधी : संजय परमसागर)
β : नाशिक रोड :⇔छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट,नाशिक, महाराष्ट्र राज्यचा वर्धापन दिन उत्साहात साजरा !-(प्रतिनिधी : संजय परमसागर)
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट, नाशिक, महाराष्ट्र राज्यचा वर्धापन दिन उत्साहात साजरा !
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 जून 2024
β⇔नाशिक रोड, दि.8 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):-राजा शिव छत्रपती यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन व स्वयम एज्युकेशन ट्रस्ट, नाशिक महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन दि. ६ जून रोजी उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजा शिवछत्रपती व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या मुख्य विश्वस्त सौ. पंचशील गवळी यांनी वर्धापदिनानिमित्त संस्थेला रू. ११०००/-चा धनादेश संस्थेच्या सेक्रेटरी व आंतरराष्ट्रीय वेटलीफ्टर डॉ. गीता यादव यांच्याकडे सोपवला. संस्थेचे उपाध्यक्ष संजय जोशी यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयम एज्युकेशन ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष धोंडोपंत गवळी होते. या कार्यक्रमांस खजिनदार एस.एस. अमोदकर, राजू मुसळे, आदी गवळी, कु. प्रेरणा गवळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)