बिटको महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 23 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड,दि.23(प्रतिनिधी: संजय परमसागर):- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र राज्याला अनेक थोर संत लाभले आहेत. त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज होय. एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती त्यांनी रंजल्या, गांजल्यांची सेवा केली,” असे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे, डॉ कृष्णा शहाणे, डॉ. कांचन सनानसे, लक्ष्मण शेंडगे, डॉ. विशाल माने, लेफ्टनंट विजय सुकटे यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510