





श्वानाच्या सन्मानार्थ दशक्रिया विधी: चेहेडी बुद्रुक येथे प्राण्यांच्या प्रति मानवी संवेदना

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 28 ऑक्टोबर 2024
β⇔ नाशिक रोड, ता.28 (प्रतिनिधी : गुरव पांढुरंग):- नाशिक रोड, प्रभाग क्र. १९, चेहेडी बुद्रुक – प्राणीप्रेम व माणुसकीचा आदर्श उदाहरण सादर करणारा प्रसंग चेहेडी बुद्रुक येथे पाहायला मिळाला. दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजता चेहेडी बुद्रुक येथे एक दुःखद घटना घडली, जेव्हा एका श्वानाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या श्वानाच्या निधनाने परिसरातील प्राणीप्रेमींमध्ये दुःखाची लाट उसळली, आणि या भावपूर्ण क्षणी त्यांनी सन्मानपूर्वक दशक्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला.
दशक्रिया विधी २६ ऑक्टोबर २०२४ रोजी दारणा नदीच्या तीरावर पंडित शिवम शास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. परंपरेचे पालन करीत, या विधीमध्ये श्वानासाठी विशेष पूजा, मंत्रोच्चार आणि धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. या क्षणाला एका प्राण्याच्या प्रति मानवी संवेदना व कृतज्ञतेचा उद्रेक मानला गेला.
कार्यक्रमाला श्वानप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये पांडुरंग गुरव, ऋषिकेश गुरव, ओमकार गुरव, रविशंकर गुरव, यशराज गुरव, साहिल डेरिंगे, डॉ. सुधाकर गुप्ता, भाऊसाहेब तुपे, अनिल तुपे, आणि लकी संगमनेरे यांचा समावेश होता. उपस्थितांनी आपल्या भावनांची अभिव्यक्ती करीत प्राण्यांच्या जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.
अपघातात मरण पावलेल्या श्वानाच्या सन्मानार्थ केलेल्या या अनोख्या विधीमुळे समाजातील प्राणीप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आहे. या प्रसंगी उपस्थितांनी “प्रत्येक प्राण्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे,” असे मत व्यक्त केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510