





वडिलांना कामात मदत करत सोहेलने दहावीत मिळविले ८२ टक्के गुण

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 29 मे 2024
β⇔येडशी(उस्मानाबाद),दि.29 (प्रतिनिधी : सुभान शेख):-शैक्षणिक वर्ष सन २०२४ मध्ये मार्च महिन्यात एस.एस. सी. बोर्ड परिक्षा घेण्यात आलेल्या उस्मानाबाद – धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जहागीर शेलगाव येथे रहिवासी असलेले सोहेल लतिफ पठाण तीन किलोमीटर अंतरावर असलेले येडशी येथे श्रीमान विठ्ठलराव सस्ते विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या घराची अत्यंत बिकट परिस्थिती पाहुन , वडिलांना कामात मदत करित , करित घरी बसून अभ्यास करित होता. सोहेल पठाण या विद्यार्थ्यांने एस. एस. सी. बोर्ड परिक्षा दिली. हि बोर्ड दिल्यावर एस. एस. सी. बोर्डचा निकाल २७ मे २०२४ ऑनलाईन द्वारे समजताच , इयत्ता दहावीत ८२. ८० टक्के गुण मिळवून उत्कृष्ट पद्धतीने सोहेल पठाण च्या चेहऱ्यावर हसू उमटले , हि निकाल समजताच , घरी जाऊन , आई – वडिलांना निकालाची माहिती दिली. व तसेच , सोहेल चे वडील – लतिफ पठाण मजुरी करून , स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका भागवत असे. हि उपजीविका भागवत असताना , वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांना कामात मदत करत असताना , सोहेल च्या लक्षात आले की , आपल्या घराची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. हि परिस्थिती पाहुन , घरी बसून अभ्यास करित होता. एस.एस. सी. परिक्षा चा निकाल समजल्यावर सोहेल पठाण या विद्यार्थ्याचे कौतुक करुन , अभिनंदन करुन , येडशी येथे श्रीमान विठ्ठलराव सस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक – शशांक गोपाळराव सस्ते यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )