ब्रेकिंग
β : नाशिक :⇒ ‘ एक शाम काका के नाम ‘ राजेश खन्ना यांच्या अजरामर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध …..( प्रतिनिधी- संजय परमसागर )
नाशिक : अमरकुमार प्रस्तुत " आशा मेलोडी मेकर्स " वतीने आयोजित ' एक शाम काका के नाम ' राजेश खन्ना यांच्या स्वर्णिमा हॉल येथे संपन्न . सदर कार्यक्रम स्वतः अमरकुमार , गॉडविन लुईस , संजय परमसागर , नेहा आहेर , सुनील गांगुर्डे , ताहीर शेख आदी गायकांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांची गाजलेली सदाबहार हिंदी गाणी सादर केली .
0
0
8
7
7
9
‘ एक शाम काका के नाम ‘ राजेश खन्ना यांच्या अजरामर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध “
β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक प्रतिनिधी : संजय परमसागर
β ⇒ नाशिक , ११ ऑगस्ट ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- अमरकुमार प्रस्तुत ” आशा मेलोडी मेकर्स ” वतीने आयोजित ‘ एक शाम काका के नाम ‘ या राजेश खन्ना यांच्या स्वर्णिमा हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मैफिलीत गायकांनी गायलेल्या गीतांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . सदर कार्यक्रम स्वतः अमरकुमार , गॉडविन लुईस , संजय परमसागर , नेहा आहेर , सुनील गांगुर्डे , ताहीर शेख आदी गायकांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांची गाजलेली सदाबहार हिंदी गाणी सादर केली .
याप्रसंगी ” ये शाम मस्तानी , ये रेशमी जुल्फे ,समय तू धीरे -धीरे चल , इतना तो याद है मुझे , जुबा पे दर्द भरी दास्ता , जिस गली मे तेरा घर ना हो बालमा , करवटे बदलते रहे सारी रात हम , कोरा कागज था ये मन मेरा , प्यार दिवाना होता है , दिवाना लेके आया है , युही तुम मुझसे बात करती हो , तू मेरा क्या लागे , जिंदगी के सफर मे गुजर जाते है अशी एक से एक गाणी एकल व दंद्व गीतांचे गायकांनी सुरेलपणे सादरीकरण केलेल्या गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली . प्रारंभी प्रमुख अतिथी प्रशांत दिवे , दिनकर आढाव, रोशन आढाव , मोना दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . याप्रसंगी प्रशांत दिवे व दिनकर आढाव यांनी मनोगत व्यक्त करताना राजेश खन्ना यांच्या अनेक आठवणी उपस्थितांना सांगितल्या .कार्यक्रमाचे संयोजन गायक अमरकुमार यांनी केले . कार्यक्रमाचे निवेदन शशांक कांबळे यांनी राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा देत खुमासदार पद्धतीने केले तर ध्वनीव्यवस्था पवन वंजारी यांनी उत्तम रित्या सांभाळली .
β ⇒ नाशिक प्रतिनिधी : संजय परमसागर : ताज्या व खात्रीदायक बातम्यासाठी बघत राहा दिव्य भारत बी एस एम न्यूज ,धन्यवाद !
0
0
8
7
7
9