





गोदावरी नदीच्या पुलावर भीषण अपघात एक ठार दोन जखमी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 6 जून 2024
β⇔नाशिक, दि.6 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक येथील हॉटेल गंमत -जंमत परिसरात काल मध्यरात्री एक कार थेट गोदावरी नदीत कोसळली आहे. कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली असून रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असल्याचे समजते. मागील पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात झाला असून या अपघातामध्ये चार चाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत -जंमत हॉटेल जवळ काल मध्यरात्री एका कारचा भूषण अपघात झाला. कार थेट पुलाचे कठळे तोडुन गोदावरी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. गंगापूर धरण या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात, रात्रीच्या वेळी अशा गंभीर अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)