





एस.एन.पी.टी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी यांचा ऑर्नामेंटल वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 27 जून 2024
β⇔पंचवटी (नाशिक),दि.27 (प्रतिनिधी : चेतना कापडणे):- श्री पंचवटी एजुकेशन सोसायटी अंतर्गत एस.एन.पी.टी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात २७/०६/२०२४ रोजी वृक्षारोपणाचा एक अनोखा उपक्रम साकारण्यात आला. महाविद्यालयातील फार्माकोग्नोसी या विभागाच्या वतीने विद्यालयातील तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून ४५ विविध ऑर्नामेंटल वृक्षांची लागवड करण्यात आली.
महाविद्यालयातील फार्माकोग्नोसी विभागाच्या हेड ऑफ डिपार्टमेंट प्रा. डॉ. रुपाली ढिकले आणि सहकारी यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. संस्थेतील फार्मसी विभागाचे सचिव उपेंद्रभाई दिनानि यांनी स्वतः सहभाग घेऊन वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेतील सभासद जिग्नेशभाई पटेल तसेच संस्थेतील प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा, डॉ. गणेशकुमार पंढीधर, प्रा. रुपाली जोशी आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाशभाई पटेल, सचिव देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव उपेंद्रभाई दिनानी, सहसचिव अभयभाई चोक्सी यांनी शुभेछया दिल्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)