Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β⇔ सुरगाणा शहर (नाशिक):⇔”शिक्षक” हाच खरा राष्ट्र निर्माता:विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच”-महेश पोतदार-गटविकास अधिकारी,सुरगाणा-(प्रतिनिधी : रतन चौधरी)

β⇔ सुरगाणा शहर (नाशिक):⇔"शिक्षक'' हाच खरा राष्ट्र निर्माता:विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच"-महेश पोतदार-गटविकास अधिकारी,सुरगाणा-(प्रतिनिधी : रतन चौधरी)

018491

” शिक्षक” हाच खरा राष्ट्र निर्माता : विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच”महेश पोतदारगटविकास अधिकारी, सुरगाणा  

फोटो :  सुरगाणा पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गौरवण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सह गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख.
फोटो :  सुरगाणा पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गौरवण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सह गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख.

 β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 19 जून  2024

β⇔ सुरगाणा (शहर),(नाशिक) दि.19 (प्रतिनिधी : रतन चौधरी):- “शिक्षक हाच खरा राष्ट्र निर्माता आहे. विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे,” असे प्रतिपादन गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पंचायत समिती सुरगाणा येथे केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, विस्तार अधिकारी प्रमिला शेंडगे, डॉ. नेहा शिरोरे, दिलीप नाईकवाडे, भाऊसाहेब सरकसरक आदी उपस्थित होते.

फोटो :  सुरगाणा पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गौरवण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सह गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख.
फोटो :  सुरगाणा पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गौरवण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सह गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख. 

       पोतदार म्हणाले की, “या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा सुधारला आहे. शालेय परिसर, शालेय अभिलेख,  शैक्षणिक दर्जा बरोबरच भौतिक सुविधा या गोष्टी शाळांचा दर्जा सुधारणेस मदत करतात. सुरगाणा सारख्या दुर्लक्षित आकांक्षित तालुक्याला पारितोषिक मिळाले हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अभ्यासक्रमाच्या चाकोरीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना अवांतर शिक्षणाची गरज आहे. मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थीच असतो. नवनवीन तंत्रज्ञान शिकत असतो.”

        त्यानंतर गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रम स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य संपादन करावे. भौतिक सुविधांचे खूप मोठे योगदान असते. शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षक हाच विद्यार्थ्यांसमोर रोल मॉडेल असतो. त्याचे अनुकरण विद्यार्थी करीत असतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींचा अंगीकार करण्यासाठी प्रोत्साहित करावे. अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना बॅंक, पोस्ट कार्यालय यासारखी आर्थिक साक्षरता शिकवायला हवी. पर्यावरण प्रदूषण, पेट्रोल, डिझेल इंधन बचत, पिण्याचे पाणी, स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात जनजागृती करणे आवश्यक आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक शिक्षक ठरत असतो.”

β⇔ सुरगाणा शहर (नाशिक):⇔"शिक्षक'' हाच खरा राष्ट्र निर्माता:विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच"-महेश पोतदार-गटविकास अधिकारी,सुरगाणा-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
β⇔ सुरगाणा शहर (नाशिक):⇔”शिक्षक” हाच खरा राष्ट्र निर्माता:विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच”-महेश पोतदार-गटविकास अधिकारी,सुरगाणा-(प्रतिनिधी : रतन चौधरी)

           यावेळी केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या शाळांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये जि.प. शाळा पळसन, तोरणडोंगरी, सुरगाणा नं. २, हिरीडपाडा, दरापाडा, वांगणपाडा (ह), बुबळी, मालगव्हाण, घागबरी, बा-हे, डोल्हारे, खडकी (दि), बोरचोंड, झगडपाडा, उंबरठाण, पिळुकपाडा, अंबाठा, वांगण (सु), हनुमंतमाळ, मनखेड, भिंतघर, रोटी या जिल्हा परिषदेच्या शाळांना गौरवण्यात आले. तर इतर व्यवस्थापन गटाच्या शासकीय आश्रम शाळा माणी, प्राथमिक आश्रम शाळा मोहपाडा, प्रगती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खोकरी, उच्च प्राथमिक आश्रम शाळा सुरगाणा, बिरसा मुंडा माध्यमिक शाळा गोपाळपूर, उच्च प्राथमिक आश्रम शाळा कुंकूडणे, प्रबोधन उच्च प्राथमिक विद्यालय अंबाठा, डी.टी. उच्च प्राथमिक विद्यालय घागबरी, किसन भोंडवे आश्रम शाळा आंबेपाडा, श्री दगा शंकर हिरे माध्यमिक विद्यालय करवंदे, माध्यमिक विद्यालय बा-हे, डी.पी. माध्यमिक विद्यालय बोरगाव, खाजगी अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा मनखेड, आदि जनता माध्यमिक विद्यालय आमदा (प), नुतन उच्च प्राथमिक शाळा गुही (कुंकूडणे), अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा खिर्डी, माध्यमिक विद्यालय पिंपळसोंड या शाळांना गौरवण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार, उत्तम वाघमारे, सुधाकर भोये, रतन चौधरी, मोतीराम भोये, भागवत चौधरी आदी सहभागी झाले होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूजची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                  ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

***

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!