





स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ताडपत्रीचा आधार घेऊन करावा लागतो अंत्यसंस्कार *
मृत्यूनंतर ही होते प्रेताची हेळसांड *
दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज : सुरगाणा प्रतिनिधी: एकनाथ शिंदे
सुरगाणा, ता.१७ ( दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज वृत्तसेवा ) :- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पळसन अंतर्गत पळसशेत येथे मंगळवारी रोजी मृत्यूची घटना घडली. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात स्मशानभूमी शेड नसल्यामुळे गावाकऱ्यांना चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन सरण रचावे लागले. ऐन पावसाचे दिवस असल्याने लाकडे ओली असल्यामुळे मृतदेह अर्धवट जळतात.त्यामुळे मृत्यूनंतरही प्रेताला यातना सोसाव्य लागतात. ही एक शोकांतिका आहे. वारंवार अशा घटना पावसाळयामध्ये घडूनही शासनाला व प्रशासनाला याचे काहीच गांभीर्य नाही का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सुरगाणा तालुक्यासारख्या आदिवासी बहुल भागात स्मशानभूमी शेड मंजुरी फक्त कागदावरच दिसतात. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.लोक प्रतींनिधींनी नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे .
दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज : मुख्य संपादक :. डॉ .भागवत महाले , मो ८२०८१८०५१०
