“बागलाण तालुकास्तरीय“जि.प.अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धेत घडला एक नवा इतिहास”
β : बागलाण,(नाशिक ):⇔बागलाण तालुकास्तरीय”जि.प.अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धेत घडला एक नवा इतिहास-(प्रतिनिधी-वसंत सोनवणे) β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार: दि. 7 जानेवारी 2025
β⇔बागलाण,(नाशिक),ता.7(प्रतिनिधी : वसंत सोनवणे):- बागलांणच्या पश्चिम पट्यामध्ये प्रामुख्याने शंभर टक्के आदिवासी कोकणा, भिल्ल’ समाजाचे वास्तव्य आहे. हा पट्टा तसा नैसर्गिक रित्या सुजलाम सुफलाम आहे ,पण जंगलतोडीने उन्हाळ्यात ओसाडपणा जाणवतो. ऐतिहासिक साल्हेर- मुल्हेर किल्ला, टकाऱ्या पर्वत, उबड्या हनुमान, कपार- भवानी ,मांगीतुंगी, अंतापूरचे दावल मलिक बाबा, या ठिकाणांनी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा जपून जगप्रसिध्दी मिळवलेली आहे. बागलाणच्या याच पश्चिम पट्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणे मात्र वर्षानुवर्ष जिकरीचे ठरलेले होते, परंतु कालच्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत मात्र एक आशेचा सोनेरी किरण बघायला मिळाला ,आणि त्याचा अभिमानही वाटला . बागलांणचा पश्चिम पट्यातील शाळा म्हटल्यानंतर प्रशासन व शिक्षक यांना शाळा सुस्थितीत चालवायच्या म्हटल्यावर एक मोठे आव्हानाचे व जिकरीचे काम आहे, मात्र शिक्षक व प्रशासन यांनी हे आव्हान स्वीकारून कामाला सुरुवात केली. केळझर,हरणबारी धरण,दसाणे,पठावे,भवाडे या धरणांच्या पोटाशी असलेल्या लोकांना त्याचा लाभ मिळतो,परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाळा व्यतिरिक्त पिण्याचे पाणी, शेती इत्यादीची गंभीर समस्या जाणवते. पावसाळ्यानंतर बहुतेक भिल्ल समाजाच्या लोकांचे ऊस तोडणी साठी स्थलांतर नित्याचे ठरलेले असते. अशावेळी शाळेतील मुलांची उपस्थिती व त्यांची गुणवत्ता टिकवणे मात्र फार जिकरीचे असते याचा अनुभव मला आहे ,त्यातल्या त्यात पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वर्षानुवर्षापासनं बदललेला नाही,अशा मानसिकतेतून बागलाणच्या गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्रीमती चित्रा देवरे मॅडम व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी कामाला सुरुवात केली .त्यातून आज गुणवत्तेचे पिकं बहरू लागलेली आहेत. त्याचे उदाहरण द्यायचे म्हटले, तर काल आणि परवा पार्थ इंग्लिश मेडियम स्कूल, ब्राह्मणगाव येथे अध्यक्ष चषक कला, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये सर्व शाळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवला. विशेषता जैतापूर व वग्रीपाडा शाळेच्या नृत्याची छाप माझ्या मनावर पडून गेलेली होती.किकवारी खुर्द ,मोरकूरे येथील शाळेने ही आपला चांगला ठस्सा उमटवला त्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. अंतिम निकाल जाहीर झाल्यावर, जेव्हा वग्रीपाडा शाळेचे नाव हे तालुक्यातून जिल्ह्याला समूहनृत्याचे लहान गटातून प्रतिनिधित्व करणार आहे ,हे जेव्हा जाहीर झाले तेव्हा मात्र, त्या चिमुकल्यांचा व शिक्षकांचा अभिमान वाटला .शिक्षक जर सकारात्मक असेल तर काय बदल घडू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वग्रीपाडा शाळा, आपल्या डोळ्यासमोर दिसते ,त्या शिक्षकांच्या समोर आम्ही नतमस्तक आहोत. ” एखादे वाहन रस्त्यावर उभे आहे ,तर ते चालवणे सोपे असते ,मात्र वाहन रस्त्यावर आणणे हेच खरे आव्हान असते,व त्याला गती देणे हे सुपर आव्हान असते “हे आव्हान या शिक्षकांनी पेरलेले आहे,हे बघायला मिळते .जेव्हा वग्रीपाडा सारख्या शाळा या कात टाकताना आपल्याला बघायला मिळतात, तेव्हा भविष्यकाळात आपल्या शाळा ह्या पुन्हा एकदा समाजाच्या हृदयावर राज्य करतील,हे मात्र स्पष्ट दिसते,यात्री मात्र शंका नाही ,त्यासाठी मात्र सातत्य हवे. मित्रांनो ,चला तर पुन्हा एकदा आपण या आशेच्या किरणावर स्वार होऊया. म्हणून, म्हणतोय कालच्या स्पर्धेत वग्रीपाडा शाळेने नवा इतिहास निर्माण केला ,त्यांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना मानाचा मुजरा..! श्री . वसंत सोनवणे, पद.शिक्षक, कोटबेल.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )