





येडशी येथे मोफत वारकरी सांप्रदाय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 24 एप्रिल 2024
β⇔येडशी(उस्मानाबाद),दि.24(प्रतिनिधी : सुभान शेख):-येडशी येथील श्रीसंत रामकृष्ण भऊ,भगवान भऊ,परमेश्वर महाराज मंदिर आश्रम व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि 5 मे ते 5 जून 20 24 या कालावधीत करण्यात आले आहे.
या शिबिरात 20 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे गुरकुल पद्धतीने निवासी राहून प्रशिक्षण देण्याचे व्यवस्थापन ही करण्यात आले आहे. शालेय व वारकरी संप्रदायक व सुसंस्कार स्वावलंबनाचे शिक्षण आत्मसाद करू इच्छुकांनी या शिबीरात सहभाग नोंदवण्यासाठी दि.3 मे पर्यन्त नोंदणी करण्याचे अवाहान मंदिर संस्थेचे धार्मिक कार्यक्रम प्रमुख व जालिंदर बप्पा मंडळाचे सचिव श्री महादेव जालिंदर सस्ते गुरुजी मो 9420201195 यांनी केले आहे.
* चौकट :
प्रवेशार्थी शिबीरार्थाना केले जाणारे मार्गदर्शन वारकरी, दिंडी, नृत्य, पावले. त्याच बरोबर वारकरी सांप्रदयातील भजन,संस्कृत श्लोक, हरिपाठ,गीतापाठ, गायन, वादन, नृत्य या संगीत कलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योग प्रणायाम ,सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने सामाजिक व स्वावलंबन,सुसंस्काराचे मार्गदर्शनपर धडे देण्यात येणार आहेत. श्री. महादेव सस्ते येडशी संपर्क 9420201195
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )