





गणेश शंकर महाले यांना ‘ध्येय’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024” नाशिक येथे प्रदान

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 03 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिक,दि,03(प्रतिनिधी :कु.लीना महाले):- महाकवी कालिदास नाट्यमंदिर, शालीमार, नाशिक येथे आयोजित विशेष समारंभात प्राथमिक शिक्षक गणेश शंकर महाले जिल्हा परिषद शाळा ताहाराबाद (नाशिक ) यांना ”’ध्येय’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024” प्रदान करण्यात आला. दैनिक ‘युवा ध्येय’ या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि नाशिक विभागीय कार्यालयाच्या शुभारंभ निमित्त आयोजित या सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे (ज्येष्ठ पत्रकार व लेखक) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य) दिनकर टेमकर, माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण अभिनेते रिशी जोरवर यांनीही कार्यक्रमाला गौरव वाढवला.
प्राथमिक शिक्षक गणेश शंकर महाले यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ध्येय’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024′ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमात डॉ. भागवत महाले, दिगंबर भुजबळ, प्राथमिक शिक्षक गणेश महाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. सदर सोहळ्यात ‘युवा ध्येय’ वृत्तपत्राच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. गणेश शंकर महाले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिक जिल्हयासह महाराष्ट्रातून मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )