





कठोर परिश्रम व अंगी जिद्द बाळगल्यास सहजपणे यशाला गवसणी घालता येते.- सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी
सोशल मीडियाचा सदुपयोग करुन यश मिळविता येते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज – बोरगाव :प्रतिनिधी – लक्ष्मन बागुल
β⇒बोरगाव , ता .२६ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- कठोर परिश्रम करण्याची तयारी व अंगी जिद्द बाळगल्यास सहजपणे यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी रोकडपाडा यांनी दूरस्थ प्रणाली द्वारे नाशिक येथून विद्यार्थ्यांनामार्गदर्शन केले. आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन व जल परिषद यांच्या संकल्पनेतून आदिवासी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तलाठी, वनरक्षक भरतीपूर्व परिक्षेचे आयोजन,मार्गदर्शन शिबिर जिल्हा परिषद शाळा सुरगाणा येथे दि.१६/०७/२०२३ रोजी करण्यात आले होते. दि.२२/०७/२०२३ रोजी दुसरे पर्व घेण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतन चौधरी होते. व्यासपीठावर आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशनचे रामभाऊ गावित, परशराम पाडवी, काशिनाथ गायकवाड, देविदास कामडी,यशवंत देशमुख,धनंजय भोये,संजय चव्हाण उपस्थित होते. व फाऊंडेशन अध्यक्ष रतन धुम यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी बोलुन शुभेच्छ दिल्या व कार्यक्रमाचे नियोजन फोन वरती केले.या वेळी मार्गदर्शन करतांना खांडवी म्हणाले की, कोणत्याही प्रकारची स्पर्धा असेल तर कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. नोक-यांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या भरती करीता विद्यार्थ्यांनी दररोज आठ ते दहा तास अभ्यास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या जागांपैकी एक जागा मी मिळविणारा हा ठाम निर्धार प्रत्येकांनी केला पाहिजे. अवांतर वाचन, सोशल मीडियाचा वापर, टेलिग्राफ, युट्युब, स्पर्धा परिक्षेचे अॅप डाऊनलोड करून मोबाइल चा वापर योग्य त-हेने केल्यास यश नक्कीच पदरात पडेल. इतिहास, विज्ञान, चालूघडामोडी विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. कठीण प्रश्नावर एकमेकांशी संवाद करुन बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण यावर चर्चा करावी असे मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी यांनी पन्नास स्पर्धक विद्यार्थ्यांना तात्यांचा ठोकळा हे सव्वा सहाशे रुपये किमतीचे पुस्तक मोफत वाटप करण्यात आले. आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन व जलपरिषदे मार्फत दर रविवारी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येते यावेळी अतिदुर्गम भागातील म्हैसमाळ, अंबोडे,बर्डा, पिंपळसोंड, सादुडणे, अलंगुण, वाघनखी, मांजरपाडा, खरुडे,सुभाष नगर, डोल्हारे, रतळीपाडा आदि भागातील व सुरगाणा तालुक्यातील स्पर्धेत सहभागी झाले होते.
फोटो- सुरगाणा येथे आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन व जलपरिषदे मार्फत स्पर्धा परिक्षेचे आयोजन व मार्गदर्शन.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले मो. ८२०८१८०५१०