Breaking
ब्रेकिंग

β : इगतपुरी :⇔इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी जुगरे तरुणी ठार, दहशतीचे वातावरण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतची मागणी-(प्रतिनिधी:भागवत महाले)

β : इगतपुरी :⇔इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी जुगरे तरुणी ठार, दहशतीचे वातावरण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतची मागणी-(प्रतिनिधी:भागवत महाले)

0 1 0 5 4 3

इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी जुगरे तरुणी ठार, दहशतीचे वातावरण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतची मागणी 

β : इगतपुरी :⇔इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी जुगरे तरुणी ठार, दहशतीचे वातावरण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतची मागणी-(प्रतिनिधी:भागवत महाले)
β : इगतपुरी :⇔इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी जुगरे तरुणी ठार, दहशतीचे वातावरण कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतची मागणी-(प्रतिनिधी:भागवत महाले)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकमंगळवार  : दि, 30 जानेवारी 2024

β⇔इगतपुरी, दि.30 (प्रतिनिधी:भागवत महाले) :- इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली असून कालच्या  बिबट्याच्या हल्ल्यात मीनाक्षी शिवराम जुगरे (31) वर्षीय तरुणी ठार झाली आहे. सदर दुर्दैवी घटना निशानवाडी (त्रिंगलवाडी) येथील  आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांची दहशत कायमच वाढत आहे.  अवघ्या तीन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यामध्ये लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून आपल्या मित्रांना वाचवण्याची घटना घडली होती तर आज त्याच दिवशी रात्री सिन्नर तालुक्यातील तीन बिबट्यांनी एका कुत्र्याचा फरशा पाडल्याची घटना घडली होती.
            सदर निशानवाडी (त्रिंगलवाडी) येथील दुर्दैवी  घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परीक्षण परीक्षत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी शिवराम जुगरे (31) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे, आज पहाटच्या सुमारास ही तरुणी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच डबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली.  या हल्ल्यात तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. 
             नाशिक शहर आणि परिसराच्या लगतही बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत आहे.  दोन दिवसापूर्वी नाशिक रोड जवळील कोटमगाव येथे आदल्या दिवशी गस्त घालणारा आणि कुत्र्याची शिकार करणाऱ्या बिबट्याला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले आहे.  बिबट्याचा वावर जिल्ह्यातून दिसून येत आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरलेले  आहे.  या भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मधुरा भगत यांनी केली आहे. दरम्यान वन विभागाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 

 β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 5 4 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!