ब्रेकिंग
β⇒ नाशिक : गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे : (प्रतिनिधी – छाया लोखंडे -गिरी )
β⇒ नाशिक : गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे
0
1
2
3
6
5
गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे
β⇒ दिव्यभारत बी एस एम न्यूज : नाशिक प्रतिनिधी – छाया लोखंडे -गिरी
β⇒ नाशिक, ता.२४ ( दिव्यभारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार ह्या पदांवर एस.एम. आर. के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या व संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . संस्थेच्या जनरल बॉडी मिटींग मध्ये सर्वमताने आज हा निर्णय घेण्यात आला. बी.वाय.के. महाविद्यालयात प्राध्यापिका पदापासून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. नंतर एस.एम.आर. के महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख, उपप्राचार्या व नंतर प्राचार्या पदावर मॅडमने आपल्या कार्याची मोहर उठविली. संस्थेत ही त्यांनी शाखा सचिव, नाशिकच्या विभागीय सचिव , मानव संसाधन संचालिका अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत . शिक्षण क्षेत्रात ३८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
स्त्री शिक्षणासाठी स्थापन झालेल्या एस.एम.आर.के. महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी त्यांच्या गरजांप्रमाणे व आवडी प्रमाणे अनेक पाठ्यक्रम एका छताखाली सुरु केले. विद्यार्थिनींना अध्ययनासाठी अत्यंत मोकळे व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले.
सदर महाविद्यालयाला नेतृत्व करून त्यांनी महाविद्यालयाला ‘बेस्ट इन्स्टीट्यूट इन वेस्ट इंडिया ‘ हा सन्मानाचा पुररकार मिळवून दिला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षा गौरव पुरस्कार – 2022 ही देण्यात आला. संस्थेबरोबरच त्यांनी एस. एन.डी.टी व यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अनेक महत्वाच्या पदांवर कार्य केलेले आहे. अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विद्यार्थी पीएच.डी. साठी संशोधन करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्यभारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादाक :डॉ भागवत महाले ,मो .८२०८१८०५१०
0
1
2
3
6
5