





दिंडोरी शिक्षक संघाचे पदाधिकारी शिक्षक परिषद संघटनेत दाखल

दिंडोरी शिक्षक संघात कोषाध्यक्षांसह अनेकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश, श्रावण भोयेंची सरचिटणीस पदी नियुक्ती
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 14 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिक : ता.14 ( प्रतिनिधी :रावसाहेब जाधव ):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कामकाज, प्रामाणिक शिक्षकांना न्याय देणारी संघटना , शिक्षकांच्या गंभीर प्रश्नावर योग्य प्रकारे मार्ग काढणारी, न्याय हितासाठी झटणारी संघटना म्हणून दिंडोरी तालुका शिक्षक संघाचे विद्यमान कोषाध्यक्ष, दिंडोरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्रावण रामदास भोये, विद्यमान संचालक गीतांजली भोये, शिक्षक संघाचे पदाधिकारी एकनाथ पाटील, साहेबराव पगारे अनेकांनी शिक्षक परिषदेत संजय पगार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. दिंडोरी सहकारी शिक्षक पद संस्थेच्या निवडणुकीपासूनच शिक्षक परिषदेचे सहकार्य घेऊन स्वाभिमानाने पदाधिकाऱ्यांनी पॅनल तयार करून विजय मिळवला आता पॅनल प्रमुख तसेच विद्यमान चेअरमन श्रावण भोये यांची शिक्षक परिषद दिंडोरी तालुका सरचिटणीस पदी, दादाजी अहिरे यांची शिक्षक परिषद कोषाध्यक्ष पदी तर एकनाथ पाटील व साहेबराव पगारे यांची मुख्याध्यापक प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली. एकंदरीत नाशिक शिक्षक संघाचे पदाधिकारी शिक्षक परिषदेची वाट धरत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )