





वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांची १२१ वी जयंती उत्साहात संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 5 फेब्रुवारी 2024
β⇔उपळे-दुमाला,( बार्शी ), दि,5 ( प्रतिनिधी : दयानंद रेवडकर) :- उपळे-दुमाला येथील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात ४ फेब्रुवारी रोजी कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विद्यालयात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा कर्मवीर जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या कर्मवीर सप्ताह सोहळ्याची समाप्ती उपळे-दुमाला गावातून कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूकीने करण्यात आली.
प्रारंभी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ८:00 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शंकर शिंदे यांनी मिरवणूक वाहनाची श्रीफळ वाढवून आणि कर्मवीर मामासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मिरवणूक मार्गस्थ केली. या मिरवणुकीत(रॅली)ढोल ताशा सहविविध प्रकारची पथके मुलांचा लेझीम,मुलींचा लेझीम, दिंडी,पथनाट्य (महिला सबलीकरण) मंगळा–गौर (लोकगीत) एकात्मिवेषभूषा,लाऊडस्पीकरच्या ताला सुरात गावच्या प्रत्येक चौका-चौकातून विद्यार्थ्यांची कला दाखवित कर्मवीरांचा जयघोष करत मिरवणूक पार पडली. गावच्या छत्रपति शिवाजी चौकात उपसरपंच नितीन बुरगुटे,गटनेते मनोज (बप्पा)बुरगुटे, किरण सोनवणे,अच्युतपवार, दत्तात्रय ठोंगे (गुरूजी),माजी मुख्याध्यापक सुरेश बुरगुटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिरगिरे,स्वप्नील बुरगुटे,गायकवाड आदि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी अनेक ग्रामस्थानी विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीसी दिली याप्रसंगी विद्यालयाला मदत करणाऱ्या मान्यवरांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सदर मिरवणूक मार्गावर गावातील महिला वर्गानी सडा-सारवण, सुंदर रांगोळी काढून रस्ता सुशोभित करण्यात होता. अनेक दानशूर लोकांनी बिस्किट,चाॅकलेट,बिसलरी पाणी बोटल,सरबताचे वाटप केले.कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास पाटील आणि महादेव बुरगुटे यांनी विद्यार्थ्यांना लाडू पुरीचे गोड जेवण दिले. तर माऊली राजेंद्र बुरगुटे यांनी विनामूल्य मिरवणूकीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. अनिल मते यांनी ही आपले वाहन मिरवणुकीत दिले. या सर्वांचा मुख्याध्यापकाचे हस्ते सत्कार करण्यात आला. रॅलीचे संपूर्ण नियोजन सहशिक्षक नवनाथ महाले एन.एन.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती तवले मॅडम,डी.डी.राऊत यांनी केले होते.
श्री.लंकेश्वर सर,श्री.सोनके सर,श्रीमती डोईफोडे(बुरगुटे)मॅडम, मकरंद जगदाळे सर, सेवक सुरवसे(मामा)यांनी विविध पथकांची तयारी करून घेतली होती. अनिल वैद्य आणि विलास शिंदे ,श्री.धनके सर आणि सेवक श्री.वाघ (मामा)यांनी उत्तम प्रकारे आर्थिक नियोजन व विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली होती. मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.मामासाहेब जगदाळे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जयंती महोत्सव यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर,क्लर्क डी.बी. धनके(पाटील),प्रत्यक्ष लक्ष्य ठेवून होते. विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन कर्मवीर डाॅ.जगदाळे मामांची १२१ वी जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पडली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510