β : नाशिक :⇔कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सेल कार्यान्वित करण्याच्या सूचना-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सेल कार्यान्वित करण्याच्या सूचना-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सेल कार्यान्वित करण्याच्या सूचना
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 8 जून 2024
β⇔नाशिक, दि.8 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):-शहराचा वाढता विस्तार व वाहनाची वाढती संख्या तसेच आगामी कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता केंद्र शासनाच्या वाहतूक मंत्रालयाने अपघात व अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना ट्रॅफिक सेल कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे महापालिकेत ट्राफिक सेल कार्यान्वित झाला असला तरी त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व यंत्रणा आतापर्यंत नसल्याने त्या सेल कडे अतिरिक्त कार्यभार म्हणून पाहिले गेले होते.
मात्र आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सेल कार्यान्वित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शहराची लोकसंख्या सध्या स्थितीत 22 लाखाच्या आसपास आहे 2050 पर्यंत हीच लोकसंख्या 60 लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे शहरांमध्ये वाहतूक समस्या निर्माण होतील व कोंडीच्या निमित्ताने ध्वनी व वायू प्रदूषण निर्माण होईल, त्यामुळे ट्राफिक सेल कार्यान्वित करणे आवश्यक आहे. महापालिकेला तशा सूचना देखील करण्यात आल्या होत्या. राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. ट्रॅफिक सेल माध्यमातून वाहतूक आराखडा तयार करणे, वाहन स्थळांची निर्मिती व वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारणे, झेब्रा क्रॉसिंग तसेच फूटपाथ व गतिरोधकाची निर्मिती करणे, सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपोस सेंटरची उभारणी करणे, पूल व बांधकाम व ब्लॉग स्पॉट निर्मूलन करण्याची जबाबदारी ट्राफिक सेलवर आहे.
सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. ट्रॅफिक सेल करता कार्यकारी अभियंता व उपअभियंता व सहाय्यक अभियंता तसेच दोन कनिष्ठ अभियंता अशा एकूण आठ पदांची निर्मिती देखील महापालिकेकडून केली जाणार आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक सेलची निर्मिती करणे गरजेचे आहे .त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली असून यापुढे वाहतूक कक्षाच्या माध्यमातून सर्व नियोजन केले जाईल. अशी माहिती सचिन जाधव कार्यकारी अभियंता महानगरपालिका यांनी दिली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)