Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : दिंडोरी ( नाशिक):⇔”शिक्षकांना संबंधित कार्य कोणत्या तासिकेत करावे,आदेशावर उल्लेख  असावा,अन्यथा बहिष्कार टाकणार”-संजय पगार- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β : दिंडोरी ( नाशिक):⇔"शिक्षकांना संबंधित कार्य कोणत्या तासिकेत करावे,आदेशावर उल्लेख  असावा,अन्यथा बहिष्कार टाकणार"-संजय पगार- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

0 0 2 5 6 1

“शिक्षकांना संबंधित कार्य कोणत्या तासिकेत करावे,आदेशावर उल्लेख  असावा,अन्यथा बहिष्कार टाकणार”-संजय पगा

β : दिंडोरी ( नाशिक):⇔"शिक्षकांना संबंधित कार्य कोणत्या तासिकेत करावे,आदेशावर उल्लेख  असावा,अन्यथा बहिष्कार टाकणार"-संजय पगार- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक):⇔”शिक्षकांना संबंधित कार्य कोणत्या तासिकेत करावे,आदेशावर उल्लेख  असावा,अन्यथा बहिष्कार टाकणार”-संजय पगार- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

सिन्नर तालुकाध्यक्ष विलास मोरे तर कार्यवाह भाऊसाहेब भालेराव

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार  : दि.22 मार्च 2024 

β⇔दिंडोरी ( नाशिक)दि. 22 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिन्नर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे राज्य कार्यवाह /सरचिटणीस मान.संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये उदावंत सर यांनी प्रास्ताविकात शिक्षक परिषदेचे कार्य व स्वतःचे हक्काचे संघटन आहे.आपणही साथ देऊया असे  मनोगतात जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, सुनिता कराड यांनी मनोगत व्यक्त केले.संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

                  याप्रसंगीप्रमुख जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, उपाध्यक्ष दिपक खैरनार, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासनी, नाशिक पतसंस्था संचालक अरविंद माळी, जिल्हा प्रतिनिधी सुदाम बोडके,सहकार्यवाह पुंडलिक शिंगाडे, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, नितीन शिंदे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या,सेवा अधिनियम कार्यालयाबाहेर कार्य कालावधी बोर्ड लावणे,दिव्यांग न्याय लढा, केंद्र प्रमुख पदोन्नती आंदोलन तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो. यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, पोषण आहार योजना त्रयस्थ यंत्रणेकडून राबवावी शिक्षक यासंबंधीचे काहिही करणार नाही. अन्यथा न्यायालयात जाणार,आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्यासाठी आंदोलन हाती घेणार, महिलांचे बदली,रजा प्रश्न, वस्ती शाळेतील शिक्षकांचे प्रश्न,फंड काढणे संदर्भात सुटसुटीत पद्धत कार्यान्वित करणे, जिल्हा परिषद नोकरीपुर्वी इतर संस्थेची सेवा गृहीत धरणे संदर्भात प्रश्न,स्थायित्व व हिंदी,भाषा सुट ,शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.
            याप्रसंगी सभासदत्व निवडून पुढील कार्यकारणी सिन्नर साठी निवडण्यात आली.तालुका नेते अनिल गडाख सर, तालुकाध्यक्ष विलास देविदास मोरे, सरचिटणीस /कार्यवाह भाऊसाहेब मुरलीधर भालेराव, कार्याध्यक्ष-चंद्रशेखर साहेबराव उदावंत, संघटक दीपक कचरू गडाख, महिला प्रतिनिधी दुर्गा सखाराम आहिरे,वर्षा प्रल्हाद ठाकरे,अनिषा वसंत देशमुख यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सुनिता म्हातारबा कराड,संपदा परमानंद बैरागी, संजीव बच्छाव, भाऊसाहेब म्हस्के, बाळासाहेब शेळके,रंगनाथ कातकाडे ही उपस्थित होते.सूत्रसंचालन चंद्रशेखर उदावंत यांनी केले, तर आभार अनिल गडाख यांनी मानले.

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 1

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!