0
1
2
9
1
1
बिटको महाविद्यालयात ” अभिमुखता आणि चिंतन “ कार्यशाळा संपन्न
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळवार : दि.२९ ऑगस्ट २०२३
β⇒ नाशिकरोड, ता २९ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- ” शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रम व प्रकल्प , उद्योजकीय योग्यता कसे विकसित करता येईल आणि याचा लाभ विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना स्वावलंबी कसे बनवता येईल व देशाच्या विकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी आपण योगदान दिले पाहिजे ,” असे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे यांनी सांगितले .
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कला विभागावतीने आयोजित ” अभिमुखता आणि चिंतन ” कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते . याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे यासह विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले , डॉ. सुधाकर बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले . त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले . याप्रसंगी प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . डॉ.पाठारे यांनी श्रेयांक पद्धत समजावून सांगून परीक्षेचे स्वरूप सेमिस्टर पॅटर्न शैक्षणिक प्रवास यशोदायी व्हावा यासाठी महाविद्यालयात राबवले जाणारे विविध उपक्रम व अंतर्गत मूल्यमापन तसेच महाविद्यालयात असणारे विविध सुविधा विद्यार्थी कल्याण मंडळ एनएसएस एनसीसी विद्यार्थी सभा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर कट्टा आदी विषयी सविस्तर माहिती दिली . प्रा. डॉ. के. एम. लोखंडे , डॉ.घनश्याम बाविस्कर , डॉ. कृष्णा शहाणे , डॉ. सुरेश कानडे , डॉ. शशिकांत साबळे , मिनल निकम , धनंजय बर्वे आदींनी संबंधित विषयांची ओळख करून दिली . प्रा. लक्ष्मण शेंडगे यांनी डेमो इलेक्शन अँड गव्हर्नन्स तर डॉ. सुधाकर बोरसे यांनी पर्यावरण व करियर कट्टा विषयी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली . डॉ. सुधाकर बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार डॉ. सुभाष भोसले यांनी केले . यावेळी तांत्रिक सहाय्य प्रा . नरेश पाटील आणि डॉ. अनिल सावळे यांनी केले . डॉ. विजय धनेश्वर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली . याप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०