0
1
2
9
1
1
51 वे बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आमदार बोरसे यांच्या हस्ते उद्घाटन,
“विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळतो”- आमदार दिलीप बोरसे
“‘समाजातील अंधश्रद्धा समस्येवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन ही आजच्या काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन म.वि.प्र सरचिटणीस- ॲड.नितीन ठाकरे
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 21 डिसेंबर 2023
β⇔ताहाराबाद, ता,२१ ( प्रतिनिधी : डॉ प्रसाद सोनवणे ) :- “भावी आयुष्यातील नवीन शास्त्रज्ञांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळत असतो, तसेच समाजातील अंधश्रद्धा सारख्या समस्येवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन ही आजच्या काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन म.वि.प्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले.करंजाड येथील सिध्दी इंटरनॅशनल अकॅडमी सिद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित ५१व्या सटाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी बागलाण तालुक्याचे सटाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप बोरसे, म.वि.प्र.चे चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे,संदीप गुळवे, संचालक शिवाजी गडाख , उपाध्यक्ष विश्वास मोरे , बागलाण तालुक्याचे तहसिलदार कैलास चावडे, पंचायत समिती बागलाण गटशिक्षणाधिकारी चिञा देवरे, शिक्षणविस्तार अधिकारी विजय पगार, संस्थेच्या सचिव डॉ. मेघनाताई सोनवणे, जि.प. सदस्य प्रशांत सोनवणे, शालेय व्यवस्थापक अमर रोहमारे , संस्थेचे सर्व ट्रस्टी , साखरचंद कांकरिया, नामपुर मार्केट यार्ड संचालक पंकज भामरे हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती बागलाण तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सिद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल करंजाड यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवशीयविज्ञान प्रदर्शन प्रसंगी बागलाण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी शेती संदर्भातील उपकरणे, आधुनिक ग्रामीण भागात उपयुक्त ठरणारी उपकरणे,नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर,असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थी व संबंधित विषय शिक्षकांनी मांडले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आप आपल्या प्रोजेक्टची माहिती प्रमुख पाहुण्यांना समजावून सांगितली. या विज्ञान प्रदर्शनासाठी सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी करंजाड येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
विज्ञान प्रदर्शनात पुर्व प्राथमिक-९, प्राथमिक-३६, माध्यमिक-४८, आदिवासी प्राथमिक आश्रमशाळा- ०७,आदिवाशी माध्यमिक आश्रमशाळा- १८,दिव्यांग विद्यार्थी-०१,प्राथमिक शिक्षक-०६, माध्यमिक शिक्षक- ०६ सहभागी विद्यार्थी- २२७ शिक्षक-१५ आदि शाळांनी घेतला सहभाग खूपच गर्दी होती,सिद्धी शाळेने बसेस उपलब्ध करून दिल्याने सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघता आले , सर्व कार्यक्रम व प्रदर्शन नियोजन बद्ध झाले. प्रास्ताविक शिक्षणविस्तार अधिकारी विजय पगार यांनी केले. मुख्याध्यापक प्रविण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०