





बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सादर केले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प

⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 29 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड,दि, 29 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बायोटेक व कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित ‘ अविष्कार ‘ स्पर्धेसाठी महाविद्यालयीन पातळीवर नाविन्यपूर्ण कल्पना व संशोधनपर प्रकल्प सादर केले.
अविष्कार ‘ स्पर्धेत विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी – पशुपालन , इंजिनिअरिंग, औषध फार्मा आदी गटातील फळांवरील रोगांवरील एआय माध्यमातून संशोधन, दुधाच्या भेसळीतील घटक ओळखण्यासाठी रॅपिड किट, डायबिटीक पेशंटसाठी जेल मलम, ऑडिओ आणि आवाजाच्या सिग्नलचा वापर करून मानव्य भाषण समजण्याचे तंत्रज्ञान, रॅट रिपेलंट यासारखे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजूषा कुलकर्णी यांच्या हस्ते उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, डॉ. के. सी. टकले, डॉ. आकाश ठाकूर यांच्या उपस्थितीत सहा. प्रा. किशोरी धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यात एकूण ३६ विद्यार्थ्यांनी १८ प्रकल्प सादर केले. स्पर्धेचे परीक्षण सहा प्रा. प्रिया सोनवणी व रूपाली चव्हाण यांनी केले.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )