





गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा व मुस्लिम बांधवांनी श्रावण सोमवारी कुर्बानी न देण्याचा चेहेडी गावचा निर्धार
β⇒ दिव्य भारत बी एस न्यूज :नाशिक रोड – प्रतिनिधी : खास
β⇒ नाशिक रोड , ता . ८ ( दिव्य भारत बी एस न्यूज वृत्तसेवा ) :- नाशिक जिल्हा गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गुरव यांच्या शिष्टमंडळाने ओंकार गुरव, रविशंकर गुरव, पांडुरंग गुरव, यशराज गुरव ,शरद वाघ आदींनी नाशिक रोड येथील चेहेडी गाव प्रभाग क्रमांक 19 मध्ये जनजागृती करून येणाऱ्या श्रावण सोमवार निमित्त सर्व खाटीक बांधवांच्या वतीने ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी न देण्याचा व त्यादिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावेळी खाटीक वासिम. खाटीक फैयाज. शेख असीम. शहा जावेद. खान मज्जिद .शेख फिरोज. आधी खाटीक बांधवांनी सोमवारी दुकान बंद ठेवून येणाऱ्या दर श्रावण सोमवारी कुर्बान नदेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांनी सूचना केल्याप्रमाणेआपण सांगितल्याप्रमाणे ईदला देखील मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली नव्हती व दर श्रावण सोमवारी आम्ही दुकाने पूर्णपणे बंद ठेवून कुर्बानी न देण्याचा निर्धार व्यक्त करतो अशी ग्वाही दिली.
β⇒ दिव्य भारत बी एस न्यूज :– मुख्य संपादक : डॉ भागवत महाले ,मो . ८२०८१ ८०५१०
