





नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ननाशी गावात खळबळजनक घटना: पिता-पुत्रांनी शेजाऱ्याचा जीव घेतला

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.02 जानवरी 2024
β⇔वणी (नाशिक),ता.02 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खळबळजनक घटना घडली. वादग्रस्त कारणांवरून पिता-पुत्रांनी आपल्या शेजाऱ्याचा कोयत्याने निर्घृण खून केला. दक्षिणात्य सिनेमा स्टाईलप्रमाणे मृत व्यक्तीचे शीर धडापासून वेगळे करून आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाले. या घटनेने संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
घटनेचा मागोवा सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके हे ननाशी गावात गुलाब रामचंद्र वाघमारे यांचे शेजारी राहतात. दोन वर्षांपूर्वी सुरेश बोके यांच्या मुलीचे ठरलेले लग्न मोडले होते. यावरून वाघमारे कुटुंबीयांशी त्यांचा वाद सुरू होता. यानंतर काही दिवसांनी मुलगी सासरहून बेपत्ता झाली. या प्रकरणात गुलाब वाघमारे हेच जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. 31 डिसेंबर रोजी वाद पुन्हा उफाळला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी रोजी, वाद अधिक तीव्र झाला. त्या वेळी, सुरेश बोके आणि त्यांच्या मुलाने गुलाब वाघमारे यांच्या मानेवर कोयत्याने वार करत त्यांचे शीर धडापासून वेगळे केले.
पोलिस ठाण्यात स्वाधीन घटनेनंतर, सुरेश बोके आणि विशाल बोके यांनी आपल्या हातातील कोयता आणि कुऱ्हाड घेऊन थेट पोलिस ठाण्यात हजेरी लावली. त्यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.गावात खळबळ या घटनेमुळे ननाशी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वादाचे मूळ कारण आणि या क्रूर हत्येची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
पोलिस तपास सुरू प्रकरणाचा तपास सुरू असून, प्राथमिक माहितीवरून हा खून वादग्रस्त कारणांवरून घडल्याचे समोर आले आहे. अधिक तपासासाठी आरोपींची चौकशी केली जात आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
–