





येडशी बसस्थानकातील महिला शौचालयाचे अर्धवट राहिलेले काम सुरु , ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ चा दणका !
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.3 फेब्रुवारी 2025
-
β⇔येडशी (धाराशिव )दि.3 (प्रतिनिधी: सुभान शेख ):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथे ग्रामस्थांच्या मिळालेल्या माहितीनुसार अशी की, मागील काही वर्षांपासून येडशी बसस्थानक परिसरातील महिला शौचालयाचे अर्धवट काम बरेच वर्षांपासून लातुर जिल्ह्यातील मुरुड येथे स्थायिक असलेले गुत्तेदार (ठेकेदार) ने काम करीत असताना, सोडून देण्यात आले होते. हे काम रखडले असताना , “दिव्य भारत बीएसएम न्यूज यु ट्युब चॅनल”-“दिव्य भारत बीएसएम न्यूज” चे येडशी प्रतिनिधी ने या महिला शौचालयाकडे धाव घेतली, व सुरुवातीला दि.11 जानेवारी 2025 रोजी बातमी प्रकाशित करण्यात आले की, येडशी बसस्थानकावर महिला शौचालयाचा अभाव,प्रवासी महिलांची गैरसोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष,अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. तसेच 29 जानेवारी रोजी “येडशी बसस्थानकात शौचालय सुविधा अभावी प्रवासी महिलांची गैरसोय , परिवहन मंत्री – प्रताप सरनाईक यांना निवेदनवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” अशा दोन बातम्या प्रकाशित करण्यात आले होत्या. सदर बातमी प्रकाशित केलेली धाराशिव आगाराचे एसटी महामंडळाचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांना बातमी पाठविण्यात आली. हि बातमी प्रकाशित करताच धाराशिव आगाराचे डिव्हिजन अधिकारी – शशिकांत उबाळे यांना माहिती घेण्यासाठी फोन केला असता तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली आणि दि.3 फेब्रुवारी रोजी येडशी बसस्थानक परिसरातील महिला शौचालयाचे अर्धवट रखडलेले कामाला सुरू करण्यात आहे. सदर अर्धवट काम राहिलेले दोन ते तीन दिवसांत काम पूर्ण करून देतो, अशी माहिती डिव्हीजन – शशिकांत उबाळे यांनी दिली आहे. हे काम सुरू असल्याचे प्रवासी महिलांनी पाहताच आनंदाने महिलांच्या चेहऱ्यावर हसु उमटले आणि सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
सदर बसस्थानक परिसरातील महिला शौचालयाचे अर्धवट रखडलेले काम सुरू झाल्याने प्रवासी महिलांतुन धाराशिव आगाराचे एसटी महामंडळाचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी व नाशिक येथुन बातमी प्रसारित होणारे – ”यु ट्युब चॅनल” -” दिव्य भारत बीएसएम न्यूज”- मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले व येडशी प्रतिनिधी – सुभान शेख या सर्वांचे आभार मानले जात आहे. तसेच येडशी बस स्थानक परिसरातील रोड रोमिओ भटकत असलेले पोलिसांकडून मुसक्या आवळण्यासाठी लवकरात-लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येईल. अशी माहिती धाराशिव आगाराचे एसटी महामंडळाचे डिव्हिजन – शशिकांत उबाळे यांनी माहिती दिली आहे. -
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )