





“१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डे”🌹
युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर: ‘व्हॅलेंटाईन डे’युवा पिढीने जबाबदारी
साजरा करावा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.13 फेब्रुवारी 2025
β⇔ नागपूर,,दि.13 (प्रतिनिधी :रमेश लांजेवार ):– युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर आजच्या सोशल मीडियाच्या युगात युवा पिढीमध्ये भारतीय संस्कृतीचा विसर पडत असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येते.१४फेब्रुवारी म्हटले की युगलांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते.परंतु यात ते भारतीय संस्कृतीचे भान विसरतांना दीसतात. जगात संपूर्ण देश आप-आपल्या संस्कृतीची जोपासना करतात.परंतु बदलत्या काळात सध्या भारतीय युवा वर्ग पाश्चिमात्य देशांमधील संस्कृतीकडे वळतांना दीसतात.ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.भारत आपल्या संस्कृतीच्या बळावर अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करीत आहोत व जगात तिसरी महाशक्तीच्या रूपात वर येत असतांना पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करणे भारतासारख्या सुसंस्कृत लोकशाही देशाला घातक ठरू शकते.१४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे संपूर्ण जगासह भारतीय युगल मोठ्या थाटामाटात साजरा करतात.परंतु हा दीवस संपूर्णपणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे मी समजतो.व्हेलेंटाईन डे साजरा करायला हरकत नाही.परंतु आपली संस्कृती जोपासलीच पाहिजे व कोणतेही कार्य संस्कृतीलाच धरून असावे.कारण भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात आगळीवेगळी आहे. तीला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी आजच्या युवा पिढीने घेतली पाहिजे.भारतात अनेक जाती-धर्माचे लोक रहातात.त्याचप्रमाणे या पावनभुमित अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक वेशभूषा व आगळीवेगळी संस्कृती आपल्याला पहायला मिळते.
आपण देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून किंवा टोकावरून निघालो तर प्रत्येक ४० किलोमीटर अंतरा नंतर आपल्याला वेगवेगळ्या भाषेचा गोडवा पहायला मिळतो.अशा परीस्थितीत संस्कृतीची जोपासना आजच्या युगातील युगलांनी करायला पाहिजे.आज जगातील अनेक देश भारतीय संस्कृती अवगत करण्याच्या मार्गावर आहेत.याचे उदाहरण कुंभमेळ्यात दिसून येते.भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांतील नागरिक भारत भ्रमन करतांना दिसतात.भारतात ३६५ दिवसातील प्रत्येक दिवसाला आगळे-वेगळे महत्व असते हे आपणा सर्वांनाच माहित आहे.योगाची सुरूवात भारतातुनच झाली आणि योगाला संपूर्ण जगाने स्वीकारले जगातील मुस्लिम राष्ट्र असो किंवा कोणतेही राष्ट्र असो योगाला जास्त महत्व देतात हीच जडणघडण भारतीय संस्कृतीमध्ये आहे याची जाण युवकांनी ठेवली पाहिजे.त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्र भारतातुन विकसित झाले व हजारो पध्दतीची औषधी युक्त वृक्ष भारतात पहायला मिळते.परंतु आपली युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळतांना दीसते हे भारतीय देवभुमिचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी सर्वच धर्मांचे लोक आनंदाने रहातात.सोबतच भारत हा ऋशी-मुनिंचा, सुफी-साधु-संत, महाज्ञानी, क्रांतीकारक, स्वतंत्रता सेनानी,थोरपुरूषांच्या अथक प्रयत्नाने सुसंस्कृत भारत देश मोठ्या डौलाने उभा आहे. याभुमित भगवान राम, गौतम बुद्ध, महंमद पैगंबर, गुरू गोविंदसिंग इत्यादीसह अनेक देवी-देवतांचे वास्तव्य या भारत भुमीत आपल्याला पहायला मिळते.त्यांच्याच पुण्यायीने भारतीय संस्कृती विकसित झाली आहे.भारतावर सर्वच धर्माच्या देवी-देवतांचा आशिर्वाद आहे.त्याचप्रमाणे हिंदू, मुस्लिम,शिख,ईसाई, बौद्ध, जैन इत्यादी धर्माचा मोठा पगडा भारतीय संस्कृतीवर आहे.त्यामुळेच आज भारतात एकोप्याचे व खेळीमेळीचे वातावरण दिसून येते.ऐवढी अफाट आणि शक्तीशाली भारतीय संस्कृती असतांना भारतीय युगलांनी व युवकांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा किंवा पध्दतीचा अवलंब का करावा?व्हेलेंटाईन डे च्या माध्यमातून भारतीय संस्कृती धोक्यात येवु शकते याला नाकारता येत नाही.याचा विचार युवा पिढीतील युगलांनी करावा.
व्हेलेंटाईन डे साजरा करतांना भारतीय संस्कृती नुसारच साजरा करावा.कारण कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाश्चिमात्य पध्दती भारतात घर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.याला रोखण्याची नितांत गरज आहे. अन्यथा भारतीय संस्कृतीचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. हीबाब आजच्या नवीन पिढीने लक्षात ठेवली पाहिजे.पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास अवश्य करावा.परंतु त्याचा अवलंब करू नका ही माझी आग्रहाची व कळकळीची विनंती आहे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर असताना त्यांनी भारतीय संस्कृतीची प्रषंशा केली होती.परंतु अमेरिकेत गेल्यावर ६ फेब्रुवारी २०१५ ला भारतीय संस्कृतीवर ताशेरे ओढताना ते म्हणतात की गेल्या काही वर्षांपासून भारतात असहिष्णुता वाढली आहे.याचाच अर्थ असा की बोलतांना सांगायचे की तुमची संस्कृती चांगली आहे आणि मायदेशी गेल्यावर दुसऱ्याच्या संस्कृतीला असहिष्णुता म्हणायचे व आपल्या पाश्चिमात्य पध्दतीचा प्रचार करायचा हा कुठला न्याय? मुख्य कारण म्हणजे त्यांना भारतात सर्व धर्मांचे,जातीचे, पंथाचे लोक एकोप्याने रहातात ही बाब रूतली असावी.त्यामुळे मित्रांनो पुन्हा सांगतो की भारतीय संस्कृतीलाच स्वीकारावे व पाश्चिमात्य पध्दतीला “टाटा-बाय-बाय” करावे.कारण जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती “अनभिज्ञ”आहे.भारतात रामायण, गीता, कुराण, बायबल, ग्रंथ या पाच भुजांनी बनलेला भारत व भारतीय संस्कृती आहे.त्यामुळे भारतीय संस्कृतीची जोपासना करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे.मी पुन्हा एकदा सांगुईच्छीतो की व्हेलेंटाईन डे या दीवसाला भारतीय संस्कृतीला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी युगलांनी घ्यावी.भारतीय संस्कृती इतकी अबाध्य आहे की अनेक वृक्ष, फुले व फळे संस्कृतीला धरून आहे.त्यामुळे जगाच्या दृष्टीकोनातून भारतीय निसर्ग सृष्टी आगळीवेगळी दीसुन येते.आज भारत आपल्या दुश्मन देशालासुध्दा मदत करीत आहे यामागचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृती होय.आठवड्याचे ७ दीवस असतात.परंतु भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्मासाठी सातही दिवसाला वेगवेगळे महत्त्व दीसुन येते.सुर्य,चंद्र,तारे संपूर्ण जग पहाते परंतु भारतात यांची वेगवेगळ्या पध्दतीने जोपासना करून प्रत्येक धर्माच्या माध्यमातून पुजा-अर्चना केली जाते.
भारतीय संस्कृतीला देवी-देवतांनी भरपूर काही दिले जे जगात तुम्हाला कुठेही पहायला मिळनार नाही.आज भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा पहायला मिळतो यातुनच सप्तरंगी धनुष्य तयार होतो.वर्षाचे १२ महीने असतात त्यात आपल्याला आगळ-वेगळ रूप,रंग पहायला मिळते.त्यामुळे भारतीय संस्कृतीची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही आणि करणार नाही.करिता भारतीय संस्कृतीची जोपासना केलीच पाहिजे व पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याग केला पाहिजे असे मला वाटते.कारण भारतीय संस्कृती ही जगातील अजुब्यातील एक अजुबा आहे.आपण व्हेलेंटाईन डे साजरा करतांना भारतीय संस्कृती प्रमाणेच साजरा करावा.यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होवून नवचैतन्य दिसून येईल. या दिवसाला युगलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प करावा.त्याचप्रमाणे युगलांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की,१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा येथे भारतीय सैन्यावर आतंकवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता यात ४० सैनिकांचा मृत्यू झाला हा दिवस भारतासाठी अत्यंत दु:खद दिवस ठरला.त्यामुळे व्हेलेंटाईन डे साजरा करतांना भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून शहिदांना सुध्दा श्रद्धांजली वाहने गरजेचे आहे.शहिदांना कोटी कोटी प्रणाम.जय हिंद!
( प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
-
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )