





बिटको महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘मल्लखांब’ आणि ‘जलतरण’ स्पर्धेत यशस्वी


β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 23 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड,दि.23 (प्रतिनिधी : संजय परमसागर):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रनील जाधव याने यशवंत व्यायाम शाळेत झालेल्या शालेय जिल्हास्तरीय ‘मल्लखांब’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच,पार्थ सरोदे याने जिजामाता इंटरनॅशनल तरणतलाव, नाशिकरोड येथे झालेल्या ‘जलतरण ‘स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, आणि १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. कु. मनस्वी खर्डे हिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, २०० मीटर मेडली आणि १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत उत्तम कामगिरी करत विजय मिळवला.