





गरोदर गरीब महिलेवर आला रेल्वेत बिकट प्रसंग माणुसकीचे दर्शन,वर्धापनदिनी दिव्य भारत बीएसएम न्यूज संपादकांची तत्काळ आर्थिक मदत
वर्धापनदिनी दिव्य भारत बीएसएम न्यूज संपादक डॉ भागवत महाले यांनी केली फोन पे ने 1100 रुपयांची तत्काळ मदत
ऊसतोड कामगार भाड्याला पैसे ही नसल्याने उपाशीपोटी,

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 2 फेब्रुवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.2( प्रतिनिधी : सुभान शेख ):- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील(ठेंगे) वडगाव येथे ऊस तोड कामगार मजूर स्वतः ची उपजिविका भागविण्यासाठी मिरज ( जि.सांगली) तालुक्यातील धनेगाव येथे कामगार मजूर ऊस तोडीवर गेले होते. या ऊसतोड मजुरांची अंगावर पैसे घेतलेले होते. ही उचल असल्याने मुक्कदामाने काम संपल्याने गावाकडे जाण्यासाठी एक ही रुपया हातात पैसे दिले नाही.हे कामगार मजुर पंढरपूरला आले.
पंढरपूरमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर थेट आपल्या गावाकडे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्यासाठी पंढरपूरहुन परळीचे रेल्वेचे तिकीट काढले. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना , रेल्वे धाराशिव रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली असता , अचानक गरोदर आश्विनी अशोक गव्हाणे (वय – 23 ) ह्या महिलेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर धाराशिव रेल्वे स्टेशनचे रेल्वे मास्तर – सुनील कुमार यांनी ठिक रात्री 2: 30 मिनिटांनी येडशी मधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका १०८ वर असलेले चालक – शहाजी गैबी इंगळे (वय – ४५) राहणार येडशी व वैद्यकीय अधिकारी – डॉ.अंकुश माडावी (वय ३४) या दोघांनी धाराशिव रेल्वे स्टेशनकडे रात्री रुग्णवाहिका घेऊन गेले. ही रूग्णवाहिका रात्री जलद गतीने 2 : ४२ मिनिटांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागेवर पोहोचले व रुग्ण सोबत असलेले तीन महिला दोन पुरुष असे एकूण पाच जण सोबत होते. यापैकी गरोदर महिला – आश्विनी अशोक गव्हाणे (वय – 23) पती – अशोक शंकर गव्हाणे (वय – २६) आई – सुमन शंकर गव्हाणे ( वय – ७०) , लक्ष्मी यादव गिरे (वय – ३६) सर्व राहणार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ठेंगे वडगाव येथील रहिवासी आहेत.
या मजुराकडे स्वतः चे उपजिविका भागविण्यासाठी व गावाकडे जाण्यासाठी खिशातमध्ये पैसे नव्हते. ही माहिती दिव्य भारत बी एस एम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी यु ट्युब चॅनल – दिव्य भारत बीएसएमचे संपादक – डॉ. भागवत शंकर महाले यांना सविस्तर माहिती दिली. डॉ भागवत महाले यांचा वाढदिवस असल्याने सायंकाळी व्यस्त होते मात्र गरीब ऊसतोड मजुरांचा आर्थिक प्रश्न आहे. असा फोन रात्री ८:०० वाजता आला. तत्काळ ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , सदस्य यांना फोन करून माहिती द्या असे सांगितले . परंतु कोणीही आले नाही,मदत कोणाकडूनही होत नसल्याने प्रतिनिधी शेख यांनी अन्य नागरिकांना फोन केले, गरीब मजूर उपाशी आहेत आणि घरी जायला पण पैसे नाही.अशी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे . ही माहिती मिळताच डॉ. भागवत महाले यांनी 1100 रु’फोन पे ‘ ने आर्थिक मदत पाठविली आणि पाठविले पैसे तत्काळ सोबत असलेले महिलेच्या पती अशोक शंकर गव्हाणे यांच्याकडे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी दिले. त्यानंतर ही माहिती सुभान शेख यांनी येडशी येथील सचिन शिंदे(सर) यांना माहिती दिली. त्यांनी लगेच नाष्टाची व्यवस्था करुन दिली. तसेच आशा सेविका कार्यकर्ते – सिमा कदम यांनी स्वतःच्या घरी कामगार मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था व गरोदर महिलेला वेळेवर उपचारास मदत केली.
सदर गरीब ऊसतोड मजुरांनी उपचार व जेवण झाल्यानंतर या सर्वांचे आभार मानले. येडशी मधील महाराष्ट्र शासनचे ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी – सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना दिव्य भारत बीएसएम न्यूजचे प्रतिनिधी यांनी येडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले कामगार मजुर यांची आर्थिक हलाखीची परिस्थिती सांगुन देखील सदर प्रसुती झालेली महिला व कुटुंबीयांकडे कोणीही फिरकुन ही पाहिले नाही. अशी माहिती कामगार मजूर यांनी माहिती दिली आहे . माणूसकी असलेल्या समाजातील नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात येवून केलीली व्यवस्था व आर्थिक मदत ही गरीब मजुरांना आधार देणारी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता. दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल संपादक डॉ भागवत महाले, येडशी प्रतिनीधी सुभान शेख, सचिन शिंदे , सीमा कदम व सामाजिक कार्यकर्ते यांचे ऊसतोड मजुरांच्या आर्थिक प्रश्नावर तत्काळ मदत केली.परंतु असे नागरिक जे बाहेरगावी येत असतात, त्यांना कोणी ओळखत नाही . अचानक असा प्रसंग आला, तर संबंधित गावाने जबादारी घेणे आणि आधारही देणे गरजेचे आहे. भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्ये व प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे येडशीसह महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510