





‘महाविद्यालयीन युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे’- प्रशांत बच्छाव

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 28 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.28 (प्रतिनिधी : संजय परमसागर):-“आपल्याला मिळालेले आयुष्य सन्मानाने जगा. संकटावर मात करण्यासाठी आपले आत्मबल वाढवा. चांगला अभ्यास करून आपले करिअर घडवा. सकारात्मक विचार करा. अमली पदार्थांचा विळखा अशा आशयाच्या बातम्या रोज वाचतो, ऐकतो. आजची बहुसंख्य तरुण पिढी आमले पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. पालकांनाही त्याबाबत समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले आहे. कुठलाही अमली पदार्थ शरीरासाठी घातक आहे, ” असे मार्गदर्शन करताना गुन्हे शाखेचे डिसिपी प्रशांत बच्छाव यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये झालेल्या ” जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त जनजागृती पर आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुन्हे शाखेचे एपीआय हेमंत नागरे, भोई साहेब, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य अनिलकुमार पठारे, आयक्यू एसी व विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, डॉ. आकाश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात २६ जून रोजी ‘ जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका असे सांगितले. हेमंत नागरे यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे ‘ विविध प्रकारचेअमली पदार्थ व व्यसन ‘ यांची लक्षणे, दुष्परिणाम व त्यापासून प्रवृत्त होण्यासाठी जनजागृती बाबत माहिती दिली. गुन्हेगार आपल्या नशेची गरज भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन गुन्हे करत असतात. त्यामुळे त्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होते असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार पठारे यांनी एन ई पी नवीन शैक्षणिक धोरण बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार डॉ. संतोष पगार यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व वरिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी व एअर विंग, एन एस एस, वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)