





बिटको महाविद्यालयात ‘ओझोनचे संरक्षण आपले रक्षण’ या विषयावर सुजाता बाबर यांचे व्याख्यान संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 23 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड,दि.23 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- “पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीअरमध्ये वायूचा एक नाजूक थर आहे, ज्यामध्ये ओझोन रेणूंचे प्रमाण तुलनेने जास्त असते. हा थर सूर्याच्या अतिनील किरणोत्सवर्गाच्या हानिकारक परिणामांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, ज्यामुळे त्वचेचे अनेक रोग होऊ शकतात. मोन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे रेफ्रिजरेटर, एअर कूलिंग सिस्टीम, आणि इतर उत्पादनांमध्ये करणारी रसायने HFC टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आली आहेत,”असे मार्गदर्शन करताना खगोल मंडळ अभ्यासक व स्तंभ लेखिका सौ. सुजाता बाबर यांनी सांगितले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कनिष्ठ बिटको महाविद्यालय भूगोल विभागातर्फे आयोजित ‘ओझोनचे संरक्षण आपले रक्षण’ या विषयावर त्या बोलत होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, प्रा. रागिणी भवर, सुरेखा वसईकर, स्टाफ सेक्रेटरी राहुल पाटील, संतोष गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय मार्गदर्शन करताना उपप्राचार्या सुनिता नेमाडे यांनी आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी जीवन रक्षणासाठी ओझोन थराचे महत्त्व समजून घेण्याची आणि त्याबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांपासून जोखीम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि सनस्क्रीन वापरणे, संरक्षक कपडे परिधान करणे, तसेच जास्त सूर्यप्रकाश टाळणे यासारख्या उपायांनी अतिनील किरणांपासून कसे संरक्षण करता येते, हे सांगितले.
कार्यक्रमाचे तांत्रिक साह्य भूषण कोतकर यांनी केले, सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी तर परिचय व आभार प्रा. रागिणी भवर यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )