





प्रा. डॉ. भागवत महाले यांना “महात्मा ज्योतिराव फुले आदर्श प्राध्यापक पुरस्कार” जाहीर

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 20 डिसेंबर 2024
β⇔नाशिक,ता.20 (प्रतिनिधी : शाश्वत महाले ):-मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावरील “महात्मा ज्योतिराव फुले आदर्श प्राध्यापक पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, नंदुरबार यांच्यातर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. भागवत महाले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, कौटुंबिक समस्या निवारण, वंचित नागरिकांसाठी आरोग्य व आर्थिक मदतीच्या उपक्रमांमध्ये मोलाचे कार्य केले आहे.
*शैक्षणिक उल्लेखनीय कार्य व योगदान:* डॉ. महाले यांच्या शैक्षणिक योगदानामध्ये 45 हून अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील रिसर्च पेपर्स, चार पेटंट्स, आणि तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन कार्यामध्ये 20 हून अधिक वर्षांपासून बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.
*पुरस्कार प्रदान सोहळा:* हा पुरस्कार सोहळा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता ‘भारती रेसिडेन्सी’, करण चौफुली, जिजामाता कॉलेज रोड, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. ज्योती आर. लष्करी आणि राष्ट्रीय संचालक श्री. गोपाल देवरे यांनी दिली आहे.
डॉ. भागवत महाले यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510