





संदीप फाऊंडेशन फार्मसी आयोजित द्वितीय खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न!

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 8 जून 2024
β⇔महिरावणी (नाशिक), दि.8(प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ):- नाशिक, येथे ३० जून २०२४ रोजी नाशिकमधील नामवंत शैक्षणिक संस्था संदीप फाऊंडेशन आयोजित बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा निसर्गरम्य अश्या संदीप फाऊंडेशनच्या फार्मसी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. विजेत्यांना तब्बल ३० हजार रुपयांची रोख पारितोषिके ५२ आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा ८ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामधून पुणे, कोल्हापूर, धुळे, अहील्यानगर, श्रीरामपूर, नंदुरबार, दोंडाईचा येथून एकूण २०२ तुल्यबळ स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतल्यामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. अग्रमानांकित खेळाडू श्रीराज भोसले आणि द्वितीय मानांकित खेळाडू साहिल शेजल ह्यांच्यातील सामन्याने डोळ्यांचे पारणे फेडले. क्षणाक्षणाला बदलणारे डावपेच सर्वांची उत्कंठा वाढवत होते. अखेरीस दोघांमधील सामना बरोबरीत सुटला. अखेरच्या आठव्या फेरीनंतर दोघांचे सुद्धा ७.५ गुण होते मात्र सरस कामगिरी आधारे श्रीराज भोसले याने विजेतेपद तर साहिल शेजाल ह्याने उपविजेतेपद पटकावले. नाशिकची आघाडीची महिला खेळाडू धनश्री राठी हिला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संदीप फाऊंडेशन फार्मसी चे प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक डॉ. परेश रेगे, डॉ. संदीप पाटील श्री भालेराव तसेच तांत्रिक सहकार्य रेवोल्यूशनरी चेस कॉर्पस ह्यांनी दिले. स्पर्धेचे मुख्य पंच फिडे ऑर्बिटर पुष्कर जाधव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य पंच म्हणून फिडे ऑर्बिटर हर्षल वाल्डे, फिडे ऑर्बिटर वैभव देशमुख तसेच पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच प्रमोद गंधगोळे, चैतन्य दिवेकर ह्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय प्रशिक्षक वरद देव ह्यांनी समन्वयक म्हणून भूमिका बजावली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)