





चांडक बिटको चांडक महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर भूगोल विभागातर्फे सेमिनार संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 22 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.22( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकरोड येथील चांडक बिटको चांडक महाविद्यालयात भूगोल दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागातर्फे संशोधन पद्धतीवर एक दिवशीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते. साधन व्यक्ती म्हणून के.व्ही.एन. नाइक महाविद्यालय, नाशिक येथील डॉ. राजेंद्र झोळेकर यांनी संशोधन पद्धती (Research Methodology) या विषयी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी संशोधन पेपर , प्रबंध लिहिताना कोणती काळजी घ्यावी, त्याचे क्रमवार टप्पे, संशोधनाचे विविध प्रकार , हे संशोधन समाजासाठी कसे उपयुक्त होऊ शकेल या दृष्टीने त्यांनी सविस्तर मार्दर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनीही उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर दिवशी भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स तयार केली होती. विविध वक्त्यांनी भूगोल दिनाचे कार्य विद्यार्थ्यांना समजावे म्हणून त्यांचे डिजिटल पोस्टर्स यांचेही उद्घाटन करून हे प्रदर्शन दिवसभर ठेवण्यात आले होते. १४ जानेवारी ते १८ जानेवारी पर्यंत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक प्राध्यापक व विद्यार्थी सदर स्पर्धेत सहभागी झाले होते, याशिवाय प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेटी देऊन उत्तम प्रतिसाद नोंदवला.
कला शाखेचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिलकुमार पठारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून भूगोल दिन व विभागाचा आढावा घेतला. डॉ. अर्चना पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तंत्र व्यवस्था प्रा. नरेश पाटील, आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मण शेंडगे तर सूत्रसंचालन डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०