





संगीत रजनीत अजरामर गीतांनी रसिकश्रोते मंत्रमुग्ध

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 28 मे 2024
β⇔नाशिकरोड, दि. 28(प्रतिनिधी : संजय परमसागर ):- संविधान कराओके टीमच्या वतीने आयोजित ‘संगीत रजनी’ या सदाबहार मैफिलीत अजरामर गीतांनी रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले. नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस जिमखाना हॉल येथे रविवार, २८ जुलै २०२४ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित या कार्यक्रमाचा प्रारंभ बुद्धमूर्ती समोर मेणबत्ती प्रज्वलित करून आणि अस्मिता गादेकर यांच्या ‘प्रथम नमो गौतमा’ या गाण्याने करण्यात आला.
या संगीत रजनी कार्यक्रमाचे संयोजन राजन गायकवाड आणि मीनाताई गांगुर्डे यांनी केले होते. राजन गायकवाड, रमाकांत गायकवाड, गौतम भदाणे, अशोक दिवे, संजय परमसागर, अजय चव्हाण, जयवंत गांगुर्डे, भरत भोई, सुनील मराठे, प्रदीप भावसार, सुनील डिंगोरे, ताहीर शेख, संजय देशपांडे, संजय दुलगज, रूपाली तायडे, शिल्पा पगारे, वनिता आहेर, अस्मिता गादेकर, रितिका गायकवाड, मीना पाठक, नीता चव्हाण, शैलजा सोनार, सुधा घिल्डीयाल, सविता सहानी यांनी विविध गाजलेली सोलो आणि डुएट हिंदी व मराठी गाणी सादर केली.
कार्यक्रमाला नाशिकरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, सीएनपी नोटप्रेसचे जनरल सेक्रेटरी मनोज चिमणकर, आयएसपी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्रे, आयएसपी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, आरपीआयचे पवन क्षीरसागर, व्यावसायिक मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वनी व्यवस्था सोहेल माणियार यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा पगारे आणि संजय परमसागर यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार रमाकांत गायकवाड यांनी मानले. मोहन पवार यांनी उत्कृष्ट पाच गायक, गायिकांना बक्षिसे देऊन कलाकारांचा आनंद द्विगुणित केला. गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )