





जि. प. आदर्श शाळा कोटबेल येथे “जागतिक आदिवासी दिनानिमित्त “गलून“ स्पर्धेचे आयोजन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔ताहाराबाद (नाशिक), दि.9 (प्रतिनिधी : लीना महाले):-जिल्हा परिषद आदर्श शाळा कोटबेल(बागलाण) येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘गलून’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शंकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीतील एकूण 33 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आलिंपिक स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित या गलून स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेपूर्वी आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, पदवीधर शिक्षक वसंत सोनवणे इतर शिक्षकांनी केले.

शाळेचे शिक्षक श्री. संजय गातवे आणि प्रशांत देवरे यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. या प्रसंगी गावातील आदिवासी समाजातील कार्यकर्ते, ज्यात दिनेश परशराम माळी, किरण, रामदास कापडणीस, ओम चिंतामण पवार, समाधान केशव ठाकरे आणि सुनील दाजी सोनवणे यांचा समावेश होता, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गलून स्पर्धेत प्रथम क्रमांक साई ठाकरे, निलेश बुवाजी मोरे यांनी द्वितीय क्रमांक, तर रोशन दशरथ गायकवाड यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. विद्यार्थ्यांनी अचूक लक्षभेद करत स्पर्धेत चमक दाखवली. ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.

स्पर्धेचे परीक्षण आणि मार्गदर्शन शाळेतील मुख्याध्यापक विलास देवरे, प्रशांत देवरे, संजय गातवे, गांगुर्डे, राऊत, आणि ह्याळीज यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर गांगुर्डे आणि प्रविण ह्याळीज यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )