





बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण; विद्यार्थिनींमध्ये उत्साह

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार: दि 05 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिकरोड:, ता. 05 ( प्रतिनिधी : संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या ३० विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास योजनेअंतर्गत मोफत पासचे वितरण करण्यात आले. नाशिकरोड पंचवटी आगारचे वाहतूक नियंत्रक अरुण वांबळे यांनी बिटको कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थिनींना हे पास वितरित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वांबळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती सुनीता नेमाडे आणि पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांची भेट घेतली व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बस पास योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मोफत बस पास मिळाल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रवास खर्चातून दिलासा मिळाल्याने त्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी होतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )