शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा-आमदार नितीन पवार
β : सुरगाणा(नाशिक) :⇔शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा-आमदार नितीन पवार-(प्रतिनिधी: रतन चौधरी)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : शनिवार : दि.15 फेब्रुवारी 2025
β⇔सुरगाणा(नाशिक)दि.15 (प्रतिनिधी: रतन चौधरी ):- नागरिकांच्या आरोग्य विषयक शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करतांना केले. ग्रामीण रुग्णालय सुरगाणा सार्वजनिक आरोग्य विभाग,राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा नाशिकचे उपसंचालक डॉ.कपिल आहेर, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप रणवीर, सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, सरपंच नवसू गायकवाड, आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, मस्जिद चौधरी, माधव पवार, दीपक मेघा, जोतिंग बागुल, उमेश पालवा, युवराज लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार पवार म्हणाले की, शासना मार्फत आरोग्य विषयक अनेक योजना राबविण्यात येतात. या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांची माहिती नसल्याने या तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहचत नाहीत त्यामुळे खरे लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. यासाठी शासनाचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी योजनांची माहिती आपल्या भागातील गरजूंना माहिती करून द्यावी. यावेळी शिबीरात एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून विविध आजारांवर उपचार करण्यात आले. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या शिबिरात नाशिक जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हा भरातून विविध आजारांवरील तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यामध्ये शल्यचिकित्सक डॉ. विलास चव्हाण, हृदय रोग तज्ञ डॉ. प्रल्हाद चव्हाण, अस्थिरोग डॉ. नितीन गोडबोले, स्त्री रोग तज्ञ डॉ. महेश पाटील, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. संजय सदावर्ते, नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. सतिश बोदडे, दंतरोग डॉ. हेमराज बढे, बा-हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बोरसे, शिबिर यशस्वीतेसाठी सहायक अधीक्षक सुदाम बागुल, लिपिक रंजीत खाटीकडे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत चौधरी, इंचार्ज सिस्टर दर्शना निकुंभ, कविता पोरजे, क्रिस्टिना कळेकर, राहुल देवाडे ,प्रमोद कुंवर, किरण वरघणे, स्वाती राऊत, डॉ. प्रविण पवार, डॉ सुनयना देशमुख,डॉ. श्रीकांत कोल्हे, डॉ उद्धव ठाकरे, डॉ घनश्याम बागुल,अक्षय सोनवणे,अश्विनी गिरासे, डॉ. मालती भोये,डॉ पवन गावंडे, हेमंत बागुल, गौरव सोनवणे, निलेश गवळी, विजय भरसट,जयवंती चौधरी,डॉ योगिता जोपळे,डॉ दीपिका महाले, कल्पना मोरे, हिरा केंगा,यशोदा डोके, सूर्यभान खर्डे, सोपान शिरोळे, मुरली चौधरी, मनोहर भोये,रोहिणी घुगे, मनीषा काळे, गुलाब वारडे, मुरलीधर जाधव, कैलास पवार, प्रतिभा शिंपी, राकेश महाले,विठ्ठल भोये,संजय कासोदकर,यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समुपदेशक श्री बळीराम ढेपाळे यांनी केले,प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय चौधरी यांनी केले तर आभार राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील नागरिकांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण व्यवस्था, मोबाईल टॉवर, शाळा वर्गखोल्या, रस्ते, पुल याबाबत समस्या मांडल्या. समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले. या शिबीरा प्रसंगी जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र मार्फत रक्त संक्रमण अधिकारी डॉ दुसाने व त्यांच्या टीम ने 15 बॅग रक्त संकलन करण्यात आले.व 25 व्यक्तीची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. फोटो- सर्व रोग निदान शिबीरात मार्गदर्शन करतांना आमदार नितीन पवार, रक्तदान प्रसंगी आमदार नितीन पवार.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
6 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)