





अखेर नाशिक मतदार संघ जागेचा तिढा सुटला : हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 1 मे 2024
β⇔नाशिक,दि.1 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-संपूर्ण राज्याचे लक्ष लावून असलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा ( दि.१) करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक मतदार संघातून हेमंत गोडसे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. महायुतीकडून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाकडून या जागेवर दावा करण्यात येत होता.परंतु आज अखेर गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे गोडसे यांचा फायदा झाला , त्यामुळे गोडसे हे चौथांदा नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत . तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे असी खूप मोठी चुरस नाशिकमध्ये होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे असणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )