





सिन्नर शहरात परत एकदा पिस्तूलसह काडतुसे जप्त

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.18 मार्च 2024
β⇔ सिन्नर( ( नाशिक),दि18 ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- शहरामध्ये डुबेर नाका परिसरात एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसेसह एकाला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त खबर मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी हॉटेल रुद्रा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे (43 ) राहणार ढोकी फाटा, याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.
नुकतेच मागच्या आठवड्यात असेच एकाला एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. एक आठवडा होत नाही, तोच गुन्हे पथकाने एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. या कार्यवाहीमुळे सर्वत्र पोलिसांचे वाहवा होत आहे . सराईत आरोपी ज्ञानेश्वर शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०